Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agnipath Scheme: महिंद्रा नोकरी देणार अग्निवीरांना! स्वयंशिस्त आणि कौशल्य येणार कामी, ट्विट करुन दिली माहिती

अग्निपथ योजनेवरुन देशात रान पेटलेले असताना, या सर्व प्रकारावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दुःख व्यक्त केले. पण एवढ्यावर न थांबता त्यांनी या कुशल आणि प्रशिक्षित अग्निवीरांना त्यांच्या ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

Agnipath Scheme: महिंद्रा नोकरी देणार अग्निवीरांना! स्वयंशिस्त आणि कौशल्य येणार कामी, ट्विट करुन दिली माहिती
Anand Mahindra Viral Tweet Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 10:00 AM

केंद्र सरकारने सैन्य दलात भरतीसाठी अग्निपथ (Agnipath Scheme) या नवीन योजनेची घोषणा करताच देशात विरोधाचा आगडोंब उसळला. तरुणांनी हिंसक प्रदर्शन (Agitation) करत देश पेटवला आहे. सार्वजनिक संपत्तीचे अपरिमित नुकसान केले आहे. विरोध शांत करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निवीरांना (Agniveer) अनेक सरकारी सेवांमध्ये तातडीने आरक्षणाची आणि अनेक योजनांमध्ये सवलतींचा पाऊस पाडला. आता सरकारसोबतच देशातील उद्योजक ही पुढे सरसावले आहेत. अग्निपथ योजनेविषयीची साशंकता सोडून या योजनेची महती आणि महत्व त्यांनी अधोरेखीत करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.अग्निपथ योजनेवरुन देशात रान पेटलेले असताना, या सर्व प्रकारावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी दुःख व्यक्त केले. पण एवढ्यावर न थांबता त्यांनी या कुशल आणि प्रशिक्षित अग्निवीरांना त्यांच्या ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे. ट्विट करुन त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. तसेच अशा स्वयंशिस्त अंगी भिनलेल्या आणि कौशल्य प्राप्त तरुणांना त्यांच्या ग्रुपमध्ये रोजगाराची संधी उपलब्घध करुन दिली आहे.

ट्विटरवर केली घोषणा

आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर या योजनेविषयी आणि हिंसक घटनांविषयी भावनांना वाट मोकळी करुन दिली. अग्निपथ योजनेवरुन देशात सुरु असलेल्या हिंसेवरुन दुःखी झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे तरुणांना स्वंयशिस्त लागेल आणि त्यांच्यात क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्याकडे चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर कौशल्य ही असेल, या गोष्टी त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महत्वाच्या ठरतील असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिंद्रा समुह अशा प्रशिक्षित आणि क्षमताप्राप्त तरुणांना रोजगार देण्यासाठी तयार असून अशा अग्निवीरांचे समुहात स्वागत असल्याचे ट्विट महिंद्रा यांनी केले.

हे सुद्धा वाचा

रोजगाराच्या अमर्याद संधी

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत, कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांना रोजगाराच्या अनंत आणि अमर्याद संधी असल्याचा विश्वास दिला. नेतृत्व, समुहिक जबाबदारी आणि शारिरीक प्रशिक्षणाच्या जोरावर हे अग्निवीर आमच्या उद्योगांना धडाडीने पुढे नेतील. प्रशासन आणि उत्पादन मालिकेत त्यांचा महत्वाचा वाटा असेल असे त्यांनी ट्विट केले आहे.

भरती प्रक्रियेसाठी तारखांची घोषणा

सैन्य दलात भरतीसाठी तीनही सैन्य दलांनी भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीची तारीखही घोषीत करण्यात आली आहे. आर्मीसाठी 1जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. तर वायुसेनेसाठी भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरु करण्यात येईल.नाविक दलासाठी भरती प्रक्रिया 25 जूनपासून सुरु होत आहे.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.