Government Jobs 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मेगा भरती

| Updated on: Jul 21, 2022 | 4:38 PM

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक भर्ती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in या आयोगाच्या (SSC) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये ही पदं भरली जाणार आहेत. यामुळे नोकरीचे ठिकाण भारातात कुठेही असू शकते.

Government Jobs 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मेगा भरती
Follow us on

दिल्ली : पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी सरकारी नोकरीची(Government Jobs 2022) सुवर्ण संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनStaff Selection Commission (SSC)  मार्फत मेगा भरती( Mega Recruitment ) केली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक ही पदं भरली जाणार आहेत. यासाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण उमेद्वांरांना नोकरीसाठी पात्र ठरवले जाणार आहे. प्रतिमाह 35 ते 40 हजार पगार मिळणार आहे,

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक भर्ती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in या आयोगाच्या (SSC) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये ही पदं भरली जाणार आहेत. यामुळे नोकरीचे ठिकाण भारातात कुठेही असू शकते.

कोण अर्ज करू शकतो? शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजी विषय म्हणून पदव्युत्तर पदवी. याशिवाय हिंदी ते इंग्रजी भाषांतराचा दोन किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स झाला असावा.

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

एकुण जागा – पदांची संख्या निश्चिच नाही

परिक्षेचे नाव – कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा, 2022

पदाचे नाव

  1.   कनिष्ठ अनुवादक – केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा (CSOLS)
  2.  कनिष्ठ अनुवादक – M/o रेल्वे (रेल्वे बोर्ड)
  3.  कनिष्ठ अनुवादक – सशस्त्र सेना मुख्यालय (AFHQ)
  4. कनिष्ठ अनुवादक (JT)/ कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) – अधीनस्थ कार्यालये
  5.  वरिष्ठ हिंदी अनुवादक – केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग/कार्यालये

वयोमर्यादा – दि 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे – उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1992 ते 01 जनेवारी 2004 दरम्यान झालेला असावा (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, विकलांग 10 वर्ष, मा. सैंनिक 03 वर्ष सैन्य सेवा अधिक 03 वर्ष वयामध्ये सवलत)

फी –  GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/माजी सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

CBT परिक्षा दिनांक – ऑक्टोबर 2022

अर्ज अंतिम दिनांक – 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)

किती पगार मिळेल ?

केंद्रीय सचिवालय अधिकृत भाषा सेवा (सीएसओएलएस) मध्ये कनिष्ठ अनुवादक – रु.35400 ते रु.112400 (वेतन स्तर-6) प्रति महिना असे असेल
रेल्वे मंत्रालयातील कनिष्ठ अनुवादक (रेल्वे बोर्ड) – प्रति महिना 35400 ते 112400 इतका पगार मिळेल.
सशस्त्र सेना मुख्यालयात कनिष्ठ अनुवादक (AFHQ) – 35400 ते 112400 प्रति महिना असा पगार असेल.
कनिष्ठ अनुवादक (JT) / कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) अधीनस्थ कार्यालयांमध्ये – प्रती महिना 35400 ते 112400 रुपये
तर केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये वरिष्ठ हिंदी अनुवादक – 44900 ते 142400 इतका दर महिना पगार मिळले.