मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीनं होणार आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांना www.mhada.gov.in या वेबसाईटवर 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिल्यानं उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमदेवारांनी म्हाडाची अधिकृत जाहिरात वाचावी.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील 565 जांगासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 सप्टेंबर पासून सुरु झाली होती. तर, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क 15 ऑक्टोबरपर्यंत जमा करता येईल. तर, ऑफलाईन लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी म्हाडाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रथम जाहिरात वाचून नंतर अर्ज सादर करावेत.
म्हाडाकडून विविध पदांसाठी लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा होईल, अशी प्राथमिक माहिती आहे. लेखी परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि संबंधित पदाशी निगडित प्रश्न असे एकूण 200 गुणांसाठी लेखी परीक्षा होईल. पदनिहाय लेखी परीक्षेच्या काठिण्य पातळीत बदल असतील.
म्हाडाकडील विविध पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.
स्टेप 1 : प्रथम म्हाडाच्या www.mhada.gov.in वेबसाईटला भेट द्या.
स्टेप2 : ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवून रजिस्ट्रेशन करा
स्टेप 3 : नोंदणी केल्यानंतर लॉगीन करुन अर्जातील माहिती भरा
स्टेप 4 : संपूर्ण अर्ज भरल्यानंतर शुल्क भरून अर्ज सादर करा
स्टेप 5 : अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून सोबत ठेवा
इतर बातम्या:
UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, 17 ऑक्टोबरपासून परीक्षा
Mhada Recruitment 2021 for 565 post last four days remaining for apply for this post