MIDC Recruitment 2023 : एमआयडीसीत 802 पदांची भरती, अर्ज मागविण्यास सुरुवात

सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीसाठी संधी चालून आली आहे. ए, बी आणि सी ग्रुपच्या पदांसाठी ही मोठी भरती आहे.

MIDC Recruitment 2023 : एमआयडीसीत 802 पदांची भरती, अर्ज मागविण्यास सुरुवात
MIDC Recruitment 2023Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 7:46 PM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ( MIDC ) नोकरीची संधी निर्माण झाली आहे. एमआयडीसीत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी नोकर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एमआयडीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनूसार तिन्ही वर्गवारीत एकूण 802 पदांसाठी निवड प्रक्रीया राबविली जाणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्रुपी ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी जाहीरात दिली आहे. एमआयडीसीच्या https://www.midcindia.org/recruitment/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी. या पदासाठीची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरु झाली आहे. तसेच उमेदवार येत्या 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.

एमआयडीसी भरती प्रक्रीया 2023 अंतर्गत जाहीर पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. नंतर संगणकावर लॉग इन करुन उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन सादर करु शकतील. अर्ज भरताना उमेदवारांना आवश्यक एक हजार रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. मागासवर्गीयासाठी अर्जाचे शुल्क 900 रुपये ठेवण्यात आले आहे. जाहीर केलेल्या तारखेपर्यंत शुल्क भरुन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवार जर अर्जात काही त्रुटी राहीली असेल तर एमआयडीसीद्वारे ओपन होणाऱ्या एप्लीकेशन विंडोच्या माध्यमातून दुरुस्ती करु शकतात. त्यासाठी ही एप्लीकेशन विंडो 2 ते 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहतील.

अर्ज सादर करण्यापूर्वी एमआयडीसीद्वारा विविध पदांच्या भरतीसाठी ठेवलेल्या शैक्षणिक अटी आणि नियम पूर्ण केलेले हवेत. उमेदवार भरतीसाठी दिलेल्या परिपत्रकाचे वाचन करुन शैक्षणिक अर्हता आणि इतर नियम पाहू शकता. उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.

अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख – 02/09/2023

अर्ज भरण्याचा अंतिम तारीख – 25/09/2023

अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख – 10/10/2023

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 02 ते 25 सप्टेंबर 2023

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 25/09/2023

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.