Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सेवेच्या नियुक्त्या द्या, आयोगासमोर आत्मदहन करु, MPSC ला विद्यार्थ्यांचा 10 सप्टेंबरचा अल्टिमेटम

आम्हाला लवकर नियुक्त्या द्या, नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली होती.

राज्य सेवेच्या नियुक्त्या द्या, आयोगासमोर आत्मदहन करु, MPSC ला विद्यार्थ्यांचा 10 सप्टेंबरचा अल्टिमेटम
एमपीएसी
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 4:11 PM

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आला आहे. 413 पदांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

एमपीएससीला सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना मिळूनही नियुक्त्या रखडल्या

राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण असलेल्या 2019 च्या 413 पदांच्या नियुक्त्या विद्यार्थ्यांना अजूनही मिळेनात. सामन्य प्रशासन विभागानं एमपीएससीला सूचना देऊनही नियुक्त्या मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आला आहे. 10 तारखेला एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी मुंबईत तर लाखो विद्यार्थी राज्यभरात आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचं आयोगाला पत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र देण्यात आलं आहे. 2019 च्या पदभरतीतील अजून विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

सामुदायिक आत्महत्येची परवानगी द्या

आम्हाला लवकर नियुक्त्या द्या, नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली होती.

आम्ही शेतकऱ्यांची पोरं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात आम्ही पाच ते सहा वर्षे अभ्यास करून परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत. आमचे आई-वडील शेतकरी, शेत मजूर आणि कामगार आहेत. देशात शेतकरी आत्महत्या होत असताना आम्ही जीवाचे रान करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी अभ्यास केला. परीक्षेत पास झालो आणि आम्ही निवडलेही गेलो. पण आम्हाला अजून नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला आम्हाला सामोरे जावं लागत आहे, अशी व्यथाही मांडण्यात आली होती.

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मुद्दा ऐरणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची परीक्षा घेण्यात आली होती. पुण्यातील स्वप्नील लोणकर हा तरुण देखील परीक्षेची तयारी करत होता. अभियांत्रिकी परीक्षेची मुख्य परीक्षा झाल्यानं तो मुलाखतीच्या प्रतीक्षेत होता. मात्र, मुलाखत होत नसल्यानं आलेल्या नैराश्यातून त्यांनं आत्महत्या केली होती. स्वप्नीलच्या आत्महत्येचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात गाजला. यानंतर मुलाखत प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगावर सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटलेला नाही.

दुय्यम गट सेवा परीक्षेला विद्यार्थ्यांची दांडी

कोरोना विषाणू संसर्ग, लॉकडाऊन, कोरोनाची दुसरी लाट इत्यादी प्रश्नांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्यात तब्बल 40 टक्के विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते.

इतर बातम्या:

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवा, अन्यथा आंदोलन करु; नितेश कराळे गुरुजींचा सरकारला इशारा

MPSC Candidates gave warning to MPSC for appointment of State Service Exam 2019

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.