MPSC Exam : हायकोर्टाच्या आदेशानं 86 जणांसाठी प्रक्रिया जाहीर, इतर विद्यार्थीही आक्रमक, कपिल पाटील यांचे एमपीएससीला पत्र
एमपीएससीनं 2020 मधील गट ब च्या पूर्व परीक्षेत प्रश्न चुकल्यानं याचिका दाखल केलेल्या अवघ्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिलीय. इतर 3 हजार 500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा येत्या 29 आणि 30 जानेवारी रोजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा निकाल जाहीर करताना उत्तरतालिका (Answer Key ) आयोगाकडून तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरपत्रिकेवर काही विद्यार्थ्यांकडून अक्षेप घेण्यात आला होता. उत्तरपत्रिकेत अनेक प्रश्नाचे उत्तरं चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे विद्यार्थी एका मार्कामुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश हायकोर्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आल्यानं इतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तर, काही विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेणार असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे आमदार कपिल पाटील यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातलं आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमदार कपिल पाटील यांनी थेट एमपीएससी आयोगाच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहिलं आहे. एका मुळं सुमारे 3500 विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.
आमदार कपिल पाटील यांचं एमपीएससीला पत्र
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमदार कपिल पाटील यांनी थेट एमपीएससी आयोगाच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहिलं आहे. 86 विद्यार्थ्यांप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची मागणी केली आहे. कपिल पाटील यांनी काल रात्री पुण्यात येऊन एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली. एमपीएससीनं 2020 मधील गट ब च्या पूर्व परीक्षेत प्रश्न चुकल्यानं याचिका दाखल केलेल्या अवघ्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिलीय. इतर 3 हजार 500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
86 जणांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु
एमपीएससीनं 86 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आदेश काढले आहेत. अराजपत्रित दुय्यम सेवा गट ब 2020 च्या मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.हायकोर्टानं निर्णय दिल्यानंतर एमपीएससीनं आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांना 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या 86 विद्यार्थ्यांना 29 आणि 30 जानेवारीच्या परीक्षेला बसता येणार आहे. केवळ न्यायालयात गेलेल्या 86 जणांना परीक्षा देता येणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक करीता मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. pic.twitter.com/xyVYrnJGuX
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 25, 2022
विद्यार्थी हायकोर्टात याचिका दाखल करणार
एमपीएससी 2020 च्या जाहीरातीमधील पीएस आय पदाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न चुकीचा फटका बसला आहे. 86 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात केली होती याचिका त्या 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला परवानगी देण्याची हायकोर्टानं एमपीएससीला दिले आदेश. मात्र पूर्व परीक्षेचा निकालचं परत लावावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.,86 विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही मुख्य परीक्षेला बसू द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत. 3 हजार 500 विद्यार्थ्यांना प्रश्न चुकीचा फटका बसला आहे.
इतर बातम्या:
MPSC Exam : राज्य सेवा पूर्व परीक्षेचं एमपीएससीकडून आयोजन, 2 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
MPSC declare process for 86 students other aspirants said they approach court MLC member Kapil Patil wrote letter to MPSC