MPSC Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातींचा धडाका सुरुच; जीवरसयानशास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर

| Updated on: Dec 15, 2021 | 7:54 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जीवरसायनशास्त्रज्ञ पदासाठी दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आयोगानं 18 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

MPSC Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातींचा धडाका सुरुच; जीवरसयानशास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) जीवरसायनशास्त्रज्ञ (Bio Chemist) पदासाठी दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आयोगानं 18 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून 3 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अधिक माहितासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात 16 पदांची भरती

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आस्थापनेवरील जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील 16 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अलिबाग आणि सातारा येथे दोन जागा

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत असलेल्या अलिबाग व सातारा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या आस्थापनेवरील जीवरसायनशास्त्रज्ञ, गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पात्रता

जीवरसायनशास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जीवरसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक असावा, याशिवाय प्रयोगशाळेत काम केल्याचा दोन वर्षांहून अधिक अनुभव त्याच्याकडे असावा. खुल्या प्रवर्गातील उमदेवारासाठी 38 तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 इतकी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 41800 ते 132000 वेतन दिलं जाणार आहे. तर,परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक, औरंगाबाद व मुंबई जिल्हा केंद्रावर दिनांक 20 डिसेंबर, 2021 रोजीपासून आयोजित तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिनांक 13 ते 16 डिसेंबर, 2021 या कालावधीतील पुणे जिल्हा केंद्रावरील पुढे ढकलण्यात आलेल्या उमेदवारांचा समावेश सुधारित मुलाखत कार्यक्रमात करण्यात आलेला आहे.

इतर बातम्या:

वर्क फ्रॉम होम’ संपणार; कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात पुन्हा ‘ऑफिस चले हम’!

MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

 

MPSC invites application for Biochemist post released advertisement for 18 post check details here