Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC update : बनावट कागदपत्रांद्वारे अधिकारी झाल्याचं सांगत फसवणुकीचे प्रकार समोर, एमपीएससी कारवाईचा बडगा उगारणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करवून त्याआधारे काही उमेदवार आणि व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या बाबी आयोगाच्या निदर्शनास आल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.

MPSC update : बनावट कागदपत्रांद्वारे अधिकारी झाल्याचं सांगत फसवणुकीचे प्रकार समोर, एमपीएससी कारवाईचा बडगा उगारणार
MPSC च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 7:51 AM

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (Maharashtra Public Service Commission) ट्विट करत एमपीएससीमार्फत विविध परीक्षांद्वारे अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे काही उमेदवार (Candidate) आणि व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीनं (MPSC) त्यांच्या निदर्शनास आलेल्या उदाहरणांची माहिती दिली आहे. एका महिला उमेदवारानं 2020 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत नापास असूनही खेळाडू प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याचं सांगत अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित संस्थांची फसवणूक करण्यात आल्याचं आयोगानं सांगितलं आहे. तर, जालना जिल्ह्यातही दुकानदार व्यक्तीनं राज्य करनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याचं सांगत सत्कार स्वीकारले असल्याचं आयोगानं निदर्शनासून आणून दिलं आहे. संबंधित व्यक्तीविरोधात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कारवाई करण्यात येत असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

एमपीएससीचं ट्विट

अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रकार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करवून त्याआधारे काही उमेदवार आणि व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या बाबी आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. एका महिला उमेदवाराने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये अनुत्तीर्ण असताना खेळाडू प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे भासवून अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित संस्थांची फसवणूक केली आहे. जालना जिल्ह्यातील एका दुकानदार व्यक्तीने राज्यकर निरीक्षक आणि राज्यकर उपायुक्त पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडून नियुक्ती झाली असल्याचे भासवून सत्कार स्वीकारत विविध संस्था आणि वर्तमानपत्र यांची फसवणूक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या उमेदवार आणि व्यक्ती यांच्यावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

आयोगानं माहिती मागवली

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांद्वारे नियुक्ती झाल्याची माहिती देत फसवणूक करणाऱ्या उमदेवार आणि व्यक्तींची माहिती द्यावी, असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

आश्रमशाळेतील विद्यार्थिनी होणार ‘डॉक्टर”; बदलापूरच्या शबानाचा ‘एमबीबीएस’ला प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवली; वर्षा गायकवाड यांनी सांगिलला परीक्षेचा संपूर्ण प्लॅन

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.