मुंबई | 04 जानेवारी 2024 : राज्यभरातील तरूण ज्या दिवसाची आतुरतेने वाट होते, तो दिवस लवकरच येणार आहे. कारण राज्यातील 17 हजार 441 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. वित्त विभागाने ही रिक्त पदं भरायला मंजुरी दिली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होते आहे. गेल्या वर्षी पोलीस भरती न झाल्याने तरूणाई चिंतेत होती. मात्र आता यंदा 17 हजार 441 जागांसाठी भरती होणार आहे. जे लोक भरती अर्ज करतील. त्या अर्जांची छाननी केली जाईल. यंदा ही पोलीस भरती होण्याची शक्यता आहे.
जेव्हा पोलीस किंवा अन्य कोणत्याही खात्यातील पदाधिकारी निवृत्त होतात. त्या ठिकाणी नवीन लोकांची नियुक्ती केली जाते. पण ही भरती दर वर्षी केलीच जाईल, असं नाही. पोलीस भरती तर रखडलेलीच पाहायला मिळते. मात्र यंदा 17 हजार 441 जागांसाठी सरकारने मान्यता दिली आहे. मात्र त्याचं वेळापत्रक अद्याप आलेलं नाही. जेव्हा याचं वेळापत्रक येईल तेव्हा ही भरती प्रक्रिया सुरु होईल. या भरतीसाठी रतीचा अर्ज केला जातो. नंतर लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा होते.
भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागते. शैक्षणिक गुणपत्रिका, रहिवासी दाखला ही कागदपत्र द्यावी लागतात. पेपरमध्ये जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही कालावधी आखून दिला जातो. या कालावधीतच अर्ज भरावा लागतो. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होते.
सरकारकडून भरतीची घोषणा झाली की, पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सरुवात होते. याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसिद्ध होते. या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज केला जातो. नंतर मैदानी परीक्षा होते. मग लेखी परीक्षा पार पडते. मग यातील पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होते. त्यानंतर पात्र उमेदवारांचं दोन ते तीन पोलीस मुख्यलयात महिने प्रशिक्षण होतं. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रावर देखील प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण 9 महिने चालतं. त्यानंतर मग या पात्र उमेदवारांची नियुक्ती होते.