New Government Scheme : तरूणांसाठी आता मोठी संधी; प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपये, सरकारची दमदार योजना, तुम्ही नोंदणी केली का?
Government Internship Scheme : अर्थसंकल्प 2024 मध्ये केंद्र सरकारने अंतर्वासिता योजना (Internship Scheme) प्रस्तावित केली होती. ही योजना अंमलबजावणीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातंर्गत तरुणाला 5,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे. काय आहे ही योजना?
केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामाध्यमातून तरूणांना नोकरी मिळण्यासाठी मदत मिळेल. तर सोबतच त्यांना प्रति महिना 5 हजार रुपयांपर्यंतचे विद्या वेतन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात याविषयीची घोषणा केली होती. त्यासाठीची मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. सरकार त्यासाठी एक खास पोर्टल सुरू करण्याच्या तयारीत आहे. काय आहे ही योजना, जाणून घ्या…
बजट 2024 मध्ये केंद्र सरकारने अंतर्वासिता योजना (Internship Scheme) प्रस्तावित केली होती. आता योजनेची अंमलबजावणीची जोरदार तयारी सुरू आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 च्या वृत्तानुसार, राज्य सरकार कॉर्पोरेट मंत्रालयातंर्गत लवकरच इंटर्नशिप योजना सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. या वृत्ताच्या दाव्यानुसार पुढील आठवड्यात केव्हा पण सादर करण्यात येऊ शकते. त्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल सुरू करण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे.
योजनेशी संबंधित नियम आणि अटी काय?
योजनेचा फायदा घेण्यासाठी तरुणांकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. या योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराचे वय 21-24 या वयोगटातील असावे. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. नियमित पदवी शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना इंटर्नशिपचा फायदा मिळणार नाही. त्यांना ऑनलाईन कोर्स वा व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये सहभागी होता येणार नाही.
योजनेतंर्गत काय मिळतील लाभ?
या योजनेत तरूणांना कॉर्पोरेट जगताच्या गरजांनुसार, कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत करण्यात येणार आहे. या योजनेत बड्या कंपन्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतील. कंपन्या या तरुणांना प्रशिक्षण देतील आणि योग्य तरुणांना गुणवत्तेनुसार नोकरी देतील. या तरुणांना विद्यावेतन पण देण्यात येईल. त्यांना दरमहा 5,000 रुपये वेतन देण्यात येईल. हा पैसा त्यांना सीएसआर फंडातून देण्यात येईल. तर 4,500 रुपये सरकार देणार आहे. लवकरच ही योजना सरकार सुरू करणार आहे. त्यासाठीचे पोर्टल पण पुढील महिन्यात सुरू करण्याची शक्यता आहे.