नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ( ONGC ) जंबो भरती निघाली आहे. त्यामुळे तरुणांना देशातील सर्वात मोठा सरकारी उपक्रमात नोकरी करण्याची संधी आहे. एकूण तब्बल 2500 ॲप्रेंटीस पदांना भरण्यासाठी ही भरती मोहीम सुरु झाली आहे. यासाठी तरुणांनी ओएनजीसीची अधिकृत वेबसाईट ongcindia.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांना आता येत्या 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीचे निकाल 5 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील असे म्हटले जात आहे.
ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ॲप्रेंटीस पदाची भरती होत आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराने B.A/B.Com/B.Sc/B.B.A/B.E./B.Tech उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तसेच डिप्लोमा ॲप्रेंटीस पदासाठी डीप्लोमा आणि ट्रेड ॲप्रेंटीससाठी उमेदवाराला दहावी आणि बारावी आयटीआय असणे गरजेचे आहे.
ओएनजीसीच्यावतीने दिलेल्या माहीतीनूसार अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 24 दरम्यान असायला हवे.
उमेदवाराची ॲप्रेंटीस पदासाठी निवड परीक्षेत मिळालल्या गुणांनूसार होईल. जर गुणाची बरोबरी झाली तर अधिक वयाच्या उमेदवाराची निवड होईल.
ग्रॅज्युएट ॲप्रेंटीस पदावरील उमेदवारांना 9000 रुपये वेतन मिळेल. तर डीप्लोमा ॲप्रेंटीस उमेदवाराला 8000 रुपये वेतन आणि ट्रेड ॲप्रेंटीस उमेदवाराला 7000 वेतन दिले जाईल. भरतीची अधिक माहिती मिळण्यासाठी उमेदवाराने ओएनजीसीच्या वेबसाईटवरील माहिती वाचावी
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 सप्टेंबर 2023
निवड होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2023
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाईट ongcindia.com वर जाऊन 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकता.