PGCIL Recruitment 2021: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी, 1 लाखांपर्यंत पगार मिळणार

| Updated on: Aug 19, 2021 | 10:58 AM

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून फील्ड इंजिनिअर पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. पॉवर ग्रिडकडून एकूण 137 पदांची भरती केली जाणार आहे.

PGCIL Recruitment 2021: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी, 1 लाखांपर्यंत पगार मिळणार
पॉवरग्रीड
Follow us on

PGCIL Recruitment 2021 नवी दिल्ली : पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून फील्ड इंजिनिअर पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. पॉवरग्रिडकडून एकूण 137 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी powergridindia.com ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज दाखल करण्याची मुदत

फील्ड इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये इंजिनिअर्सना नोकरीची मोठी संधी आहे.

अर्ज कसा करायचा?

फील्ड इंजिनिअर आणि फील्ड सुपरवायझर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना POWERGRID च्या powergrid.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर करिअर विभाग आणि नंतर नोकरीच्या संधी नंतर “कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर फील्ड इंजिनियर आणि फील्ड सुपरवायझर या लिंक वर क्लिक करा अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्टपर्यंत सुरू राहील.

पदांचा तपशील

फील्ड अभियंता (इलेक्ट्रिकल)- 48

फील्ड अभियंता (सिव्हिल) – 17

फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) – 50

फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) – 22

पात्रता आणि वय मर्यादा

फील्ड इंजिनिअर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात बीई आणि बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 ऑगस्ट 2021 रोजी 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांकडे डिप्लोमा B.Sc, BE/ B.Tech, M.Tech/ ME पदवी असावी.

पगार आणि निवड प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड स्क्रीनिंग टेस्ट, वैयक्तिक मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

एलआयसी एएओ परीक्षा 28 ऑगस्टला

एलआयसीच्या वतीनं सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झाली होती. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2020 होती. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा होऊ शकली नाही. आता प्रवेशपत्र (LIC AAO Admit Card 2021) अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. या भरतीद्वारे एकूण 218 पदं भरली जाणार असून 28 ऑगस्ट 2021 रोजी घेतली जाणार आहे.

इतर बातम्या

Bank Job 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2,357 पदांसाठी भरती, उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

PGCIL Recruitment 2021 Power Grid Corporation of India recruitment for Field Engineer Post