वयाच्या आठव्या वर्षी लग्न, पण तयारी सुरूच; 2 मुलांच्या आईने बुरखा ते बिकिनीपर्यंतचा प्रवास कसा गाठला?
राजस्थान येथील प्रिया सिंग मेघवाल यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामगिरीचे कौतुक होत असून त्यांच्या जीवन प्रवासाची कहाणी थक्क करणारी आहे. त्यामुळे बॉडी बिल्डर प्रिया सिंग मेघवाल या चर्चेत आल्या आहे.
राजस्थान : नुकताच सातासमुद्रापार झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू म्हणजे बॉडी बिल्डर स्पर्धेत राजस्थानच्या प्रिया सिंग मेघवाल हिने थायलंडमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. जगभरात तिचे कौतुक होत असतांना तीचा बुरखा ते बिकणीपर्यन्तचा प्रवास थक्क करणारा आहे. तिच्या जीवनाचा प्रवास ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात तीने ज्या राज्याचे आणि देशाचे नाव रोशन केले, मान जगभरात उंचावली त्यांनी कुणीही तिला आर्थिक मदत केलेली नाही. अवघ्या आठव्या वर्षी प्रिया सिंग मेघवाल यांचं लग्न झालं होतं. प्रियाला दोन मुलं आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रिया या जीम ट्रेनर म्हणून काम करत आहे. प्रिया ज्या समाजातून येथे तिथे संपूर्ण आयुष्य साडी नेसणं पदर घेणं, यामध्ये जातं आणि मरण देखील त्यामध्येच जातं. त्यामुळे साडी ते बिकणी पर्यन्तचा प्रवास कसा असेल याचा अंदाज येऊ शकतो.
प्रिय सिंग मेघवाल या राजस्थान येथील आहे, त्यांचे वयाच्या आठव्या वर्षी लग्न झाले होते, त्यांना दोन मुलं आहे. प्रिया या मूळच्या बिकानेर येथील आहे.
बॉडी बिल्डर म्हणून त्यांची राजस्थानमध्ये आता मोठी ओळख झाली आहे, नुकतेच थायलंड येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे.
प्रिया या त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता जीम ट्रेनरचा जॉब करतात, त्यात त्यांची मुलगी त्यांना याबाबत मार्गदर्शन करते.
जीम ट्रेनर म्हणून कपडे कसे घालावे, आहार काय करावा याबाबत मुलीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
या काळात त्यांच्यावर समाजातून मोठी टीका झाली होती, साडीत राहणारी स्री अचानक विषभूषा बदलून काय करू लागली म्हणून नातेवाइकांनी त्यांना हिनवलं आहे.
महिलांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे तिथे काम करत असतांना बिनधास्त काम करा, कुणावरही कधीही अवलंबून राहू नका असा सल्ला दिला आहे.
यामध्ये प्रिया यांचा सुवर्णपदकाचा इतिहास पाहता त्यांना आजवर राज्य सरकारसह केंद्र सरकारने कुठलीही आर्थिक मदत केली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
सरकारने मदत केली नाही तरी मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके मिळवत राहील असा विश्वास व्यक्त करत देशाचे नाव रोशन करेल अशी प्रतिक्रिया तीने एका मुलाखतीत दिली आहे.