Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी

वेस्ट सेंट्रल रेल्वे ट्रेड अप्रेंटिस पदासाठी रेल्वे भरती करणार आहे. ही भरती एकूण 561 पदांसाठी होत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी
भारतीय रेल्वे
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 8:17 PM

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वे विभागानं मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. वेस्ट सेंट्रल रेल्वे ट्रेड अप्रेंटिस पदासाठी रेल्वे भरती करणार आहे. ही भरती एकूण 561 पदांसाठी होत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. तुमच्या अर्जात काही चूक झाली असल्यास तुम्ही तो अर्ज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सुधारणाकरुन पुन्हा अर्ज करु शकणार आहात.(Recruitment process for Apprentice post started in West Central Railway)

कुठल्या पदासाठी भरती आणि किती जागा?

वेस्ट सेंट्रल रेल्वेमझ्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे. एकूण 561 पदांसाठी ही भरती होत आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी पास असला पाहिजे. त्यासोबतच त्याने संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेटही मिळवलेलं असणं गरजेचं आहे. अर्ज करु इच्छिणारा उमेदवार कमीत कमी 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे वयाचा असायला हवा. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार त्यांच्या वयाची अट लागू असणार आहे.

निवड प्रक्रिया कशी?

उमेदवारांची निवड ही मेरीटच्या आधारावर होणार आहे. उमेदवारांचं मेरीट त्याचे 10वीचे मार्क आणि ITI मध्ये मिळालेल्या मार्कावर ठरवलं जाईल. महत्वाची बाब म्हणजे या भरती पक्रियेसाठी कोणतीही लिखीत परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

रेल्वेतील अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे काही स्कॅन केलेले कागदपत्र असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र तुम्हाला अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहे.

1. पासपोर्ट साईज फोटो 2. उमेदवारांचं स्वाक्षरी 3. 10वी पास सर्टिफिकेट 4. ITI पास सर्टिफिकेट

अर्जाचे शुल्क

जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क 170 रुपये आहे. तर SC/St/PWD/ महिला उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क 70 रुपये असणार आहे.

हे ही वाचा : 

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना

तुम्हीही आहात HDFC बँकेचे ग्राहक तर महत्त्वाची आहे ही बातमी, उद्यापासून नाही चालणार कार्ड

LIC ची कॅन्सर कव्हर पॉलिसी काय आहे? तुम्हाला काय फायदा मिळणार?

Recruitment process for Apprentice post started in West Central Railway

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.