पटापट अर्ज करा, 10 वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरी, मध्य रेल्वेत मेगा भरती

Railway Jobs : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी सुवर्णसंधी समोर चालून आली आहे. आयटीआय करून रेल्वेत नोकरी मिळण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. ऑनलाइन मोडमधून अर्ज करता येणार आहे. यासाठी शैक्षणिक योग्यता किती आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, हे सगळं जाणून घेऊया.

पटापट अर्ज करा, 10 वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरी, मध्य रेल्वेत मेगा भरती
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 11:38 AM

Railway Jobs : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी सुवर्णसंधी समोर चालून आली आहे. मध्य रेल्वेत मेगा भरती होणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती जारी केली आहे. रेल्वेतील या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2023 ला सुरू झाली. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या wcr.Indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येऊ शकतो. अधिसूचनेनुसार, पश्चिम मध्य रेल्वेच्या भरती मोहिमेद्वारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी तब्बल 3015 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये डिव्हीजन वाईज व्हेकन्सी

जेबीपी डिव्हीजन: 1164 पदं बीपीएल डिव्हीजन : 603 पदं कोटा डिव्हीजन : 853 पदं सीआरडब्ल्यूएस बीपीएल : 170 पदं डब्ल्यूआरएस कोटा : 196 पदं मुख्यालय/जेबीपी : 29 पदं

शैक्षणिक योग्यता

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी किंवा शिकाऊ उमेदवारांसाठी, किमान 50 % गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, एखाद्याने NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI केलेले असावे.

वयोमर्यादा किती ?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या भरतीसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल आणि OBC ला तीन वर्षांची सूट मिळेल. दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 10 वर्षांची सूट मिळेल. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 15 वर्षांची सूट आणि OBC प्रवर्गातील अपंग उमेदवारांना 13 वर्षांची सूट मिळेल.

अर्जाचे शुल्क किती ?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जो अर्ज भरावा लागेल, त्याचे शुल्क अथवा फी ही 136 रुपये आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 36 रुपये आहे.

सिलेक्शन कसं होणार ?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या भरतीसाठी 10वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. दोन्हीचे गुण जोडून मेरिट तयार केली जाईल. मेरिट लिस्ट ट्रेड, डिवीजन/यूनिट आणि कम्युनिटी नुसार बनवली जाईल.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.