Railway Recruitment : नौकरी है, तो सब है ! ‘या’ अर्जाची मुदत संपत आलीये, सगळं सोडून ‘हा’ अर्ज भरा !

| Updated on: Apr 23, 2022 | 10:40 AM

ऑनलाईन अर्ज भरायची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरु झालीये, शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या पदासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. अर्ज भरताना तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर आणि इमेल आयडी द्या.

Railway Recruitment : नौकरी है, तो सब है ! या अर्जाची मुदत संपत आलीये, सगळं सोडून हा अर्ज भरा !
प्रातिनिधिक छायाचित्र.
Image Credit source: Facebook
Follow us on

नवी दिल्ली : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (SWR)रेल्वे रिक्रुटमेंट सेलने (RRC) 147 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु केलीये. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 42 असावं. वयाच्या अटीत राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरायची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरु झालीये, शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या पदासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. अर्ज भरताना तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर आणि इमेल आयडी द्या.

पदाचे नाव – मालगाडी व्यवस्थापक

वयाची अट – कमाल वय 42 वर्षे

एकूण जागा – 147

शिक्षण – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज शुल्क – शुल्क नाही

अर्ज करण्याची तारीख – 1 एप्रिल 2022 ते 25 एप्रिल 2022

वेतन – 7 व्या सीपीसी लेव्हल 5 अंतर्गत पगार

निवड करण्याची पद्धत – कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय परीक्षा, संगणक चाचणी

महत्त्वाचे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – rrchubli.in

ऑनलाईन अर्ज – Click Here

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

अर्ज कसा भरणार ?

  • rrchubli.in या लिंकवर जा.
  • होमपेजवर खाली स्क्रोल करत जा, तिथे तुम्हाला भरती संबंधित एक नोटिफिकेशन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • नोटिफिकेशन साठी नोटिफिकेशन लिंक ओपन करा.
  • आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • लॉग इन करा, फॉर्म सबमिट करा.
  • कागदपत्रं आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज पूर्ण करा

टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या :

Dilip Walse Patil on Navneet Rana: राणा दाम्पत्यांना कुणाची तरी सुपारी, त्याशिवाय एवढं धाडस होऊच शकत नाही; गृहमंत्र्यांचा दावा

Pune Chandrakant Patil : मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर तुमची काय अडचण? चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

आमची इलेक्ट्रीक स्कूटर एकद ‘फीट ‘; वाहनांच्या भविष्यातील क्रांती ‘हिट’ !