RRB NTPC 2024 registration begins: भारतीय रेल्वेत नोकरीची चांगली संधी आली आहे. रेल्वेने 8113 पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. पदवीधर पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे भरती मंडळाच्या (RRB) अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन 13 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. रेल्वेत तब्बल पाच वर्षानंतर इतक्या व्यापक प्रमाणात भरती केली जात आहे.
रेल्वे भर्ती बोर्डने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (RRB NTPC रिक्रूटमेंट 2024) अंतर्गत पदवी स्तरावरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार 14 .सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान अर्ज करू शकतात. या पदांसाठी शुल्क 15 ऑक्टोंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या नोकरीत चांगला पगार आणि अनेक सुविधाही मिळतात.
रेल्वेच्या या भरतीमध्ये 8,113 पदांवर कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी आहे. ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली आहे. या पदांसाठी फक्त ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे. 14 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. ती 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत चालणार आहे.
रेल्वे भर्ती मंडळाच्या CEN 05/2024 च्या जाहिराती अंतर्गत, 8113 पात्र उमेदवारांची निवड नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेव्हल पोस्टसाठी केली जाणार आहे. ज्यामध्ये मुख्य व्यावसायिक कम तिकीट पर्यवेक्षक पदासाठी 1736 उमेदवार, 994 स्टेशन मास्टर, 3144 गुड्स ट्रेन मॅनेजर, 1507 कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक आणि 732 उमेदवार वरिष्ठ लिपिक टंकलेखक पदासाठी भरले जाणार आहेत. 18 ते 36 असणारे कोणतेही उमेदवार त्यासाठी अर्ज करु शकतात. अधिक माहितीसाठी रेल्वेने काढलेले परिपत्रक पाहावे.