RBI recruitment 2021| शिक्षणाची अट 10 वी पास, 26 हजार रुपयांपर्यंत पगार, आरबीआयमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडेंट (Office Attendant Recruitment 2021) या पदासाठी भरती सुरु आहे.

RBI recruitment 2021| शिक्षणाची अट 10 वी पास, 26 हजार रुपयांपर्यंत पगार, आरबीआयमध्ये 'या' पदावर भरती सुरु
आरबीआय
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 1:57 PM

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडेंट (Office Attendant Recruitment 2021) या पदासाठी भरती सुरु आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडेटच्या 841 पदांसांठी भरती करण्यात येत आहे. आरबीआयच्या या पदासाठी अर्ज करण्यास 24 फेब्रुवारीला सुरुवात झाली असून 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (RBI Recruitment for the post of Office Attendants 10th pass can apply 26 thousand salary)

10 वीच्या आधारावर निवड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च आहे. या पदासाठीची पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

अर्ज कसा करणार?

  1. सर्वप्रथम opportunities.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्या.
  2. होम पेज वरील ‘Recruitment for the post of Office Attendants – 2020’ या लिंक वर क्लिक करा\
  3. भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन वाचून Apply Online लिंक वर क्लिक करा
  4. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी चा वापर करा
  5. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीनं लॉगीन करा
  6. लॉगीन करुन अ‌ॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा
  7. डाऊनलोड केलेला अ‌ॅप्लिकेशन फॉर्म भरुन कागदत्रासंह पोस्टाद्वारे पाठवून द्या
  8. उमेदवार ज्या विभागात वास्तव्यास असेल त्या विभागातील आरबीआयच्या कार्यालयात अर्ज पाटवा

अर्जाची फी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील, आर्थिक मागास प्रवर्ग, ओबीसी उमेदावारांसाठी 450 रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. नोटिफिकेशन नुसार परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची विविध विभागात पोस्टिंग केली जाईल. अहमदाबाद मध्ये 50, बंगळुरूमध्ये 28, भोपाळमध्ये 25, चंडीगढ़मध्ये 31, चेन्नईमध्ये 71, हैदराबादमध्ये 57, जयपूर 43, कानपूरमध्ये 69, मुंबईत 202, नागपूरमध्ये 55 आणि नवी दिल्ली मध्ये 50 पदे निर्धारित करण्यात आली आहेत.इतर माहितीसाठी उमेदवारांनी आरबीआयच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

रविवार विशेष : नव्या वर्षात 32 हजार नव्या नोकऱ्यांची नांदी; 10 वी पासपासून PG पर्यंत शिकलेल्यांना सुवर्णसंधी

Job Alert: दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; अनेक पदांवर भरती

(RBI Recruitment for the post of Office Attendants 10th pass can apply 26 thousand salary)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.