Bank of Maharashtra Recruitment 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदावर भरती, पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज
Bank of Maharashtra Recruitment 2021: जनरल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. (Recruitment for officer post in Bank of Maharashtra)
Bank of Maharashtra Recruitment 2021: मुंबई : पदवीनंतर बँकेचे काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल ऑफिसरच्या 150 पदांवर भरती सुरु आहे. जनरल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. (Recruitment for officer post in Bank of Maharashtra, Graduate candidates can apply)
बँक ऑफ महाराष्ट्रमधील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 22 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 6 एप्रिल 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्जाची तारीख संपल्यानंतर वेबसाईटवरून ही लिंक हटवण्यात येईल. ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनलच्या प्लॅटफॉर्मवर जावे लागेल.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी प्रथम बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर जा. मुख्य पृष्ठावरील करिअर विभागात जा. त्यामध्ये करंट ओपनिंगच्या लिंकवर क्लिक करा. आता Recruitment of Generalist Officer in Scale II लिंकवर क्लिक करा. आता ऑनलाईन अर्ज करा. आता आयबीपीएस पेज ओपन होईल. यामध्ये Click here for New Registration वर नोंदणी करा आणि त्यानंतर अर्ज भरा.
रिक्त पदाचा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध शाखांमध्ये नोकरी दिली जाईल. यामध्ये बिहारमधील पटना, चंदीगड आणि मोहाली, छत्तीसगडमधील रायपूर, नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली एनसीआरचे गुरुग्राम, गोव्यातील पणजी, अहमदाबाद आणि गांधीनगर, झारखंडमधील रांची, कर्नाटकमधील बेंगलुरू, केरळमधील तिरुवनंतपुरम आणि मध्य प्रदेशातील भोपाळ या शाखांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर, ओडिशामधील भुवनेश्वरसह अनेक शहरांमध्ये जनरल ऑफिसर पदावर नोकरी मिळणार आहे. भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पगाराचा तपशील
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 48,170 रुपये ते 69,810 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. यात मूलभूत वेतन श्रेणी 48,170 रुपये आहे. याशिवाय डीए आणि एचआरए आणि लीज रेंटल यासारख्या सुविधादेखील देण्यात येणार आहे. आपण अधिकृत अधिसूचनेमध्ये संपूर्ण तपशील पाहू शकता. (Recruitment for officer post in Bank of Maharashtra, Graduate candidates can apply)
निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी! सरकारने नियम बदलले, कोट्यवधी लोकांना फायदा#EPFOpensionscheme #EPFOpensioners #newpensionrules #pension #pensionershttps://t.co/FtlHW4Jk84
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
इतर बातम्या
ISRO Recruitment 2021 : फायरमॅन आणि लॅब टेक्निशियन पदासाठी नोकरीची संधी, लवकरच करा अर्ज
Do You Know : जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?, काय आहेत याचे फायदे?