Bank of Maharashtra Recruitment 2021 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल अधिकारी पदासाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची 6 एप्रिल
बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती बँकेच्या आवश्यकतेनुसार शाखा प्रबंधक अधिकारी म्हणून देशात कुठेही पोस्ट करता येतील. त्याचबरोबर या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/ वर भेट देऊन अर्ज करावा लागेल. (Recruitment for the post of General Officer in Bank of Maharashtra, last April 6 to apply)
Bank of Maharashtra Recruitment 2021 मुंबई : बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरल ऑफिसर पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत एकूण 150 पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि 6 एप्रिल 2021 रोजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना अर्ज करावयाचे असल्यास ते अर्ज करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती बँकेच्या आवश्यकतेनुसार शाखा प्रबंधक अधिकारी म्हणून देशात कुठेही पोस्ट करता येतील. त्याचबरोबर या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/ वर भेट देऊन अर्ज करावा लागेल. (Recruitment for the post of General Officer in Bank of Maharashtra, last April 6 to apply)
Bank of Maharashtra Recruitment 2021 : भरती तपशील
एकूण – 150 पोस्ट एससी – 22 एसटी – 11 ओबीसी – 40 ईडब्ल्यूएस -15 युआर – 62
या तारखा ठेवा लक्षात
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 22 मार्च 2021 ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2021
शैक्षणिक पात्रता
जनरल ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 60% गुणांसह बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळाकडून मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून प्रोफेशनल कोर्स केलेला असला पाहिजे. याशिवाय कोणत्याही व्यावसायिक बँकेत क्रेडिट एरिया, ब्रांच अधिकारी म्हणून तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचवेळी या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असावे.
Bank of Maharashtra Recruitment 2021 : अशी असेल निवड प्रक्रिया
जनरल ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड आयबीपीएसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1: 4 च्या गुणोत्तरात मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या व्यतिरिक्त, भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात. (Recruitment for the post of General Officer in Bank of Maharashtra, last April 6 to apply)
‘शुगर फ्री पेरु’ची शेती ठरतेय वरदान, मराठवाड्यात दुष्काळी भागात शेतकऱ्याला लाखोंचा फायदाhttps://t.co/Cer3vSBA21#farmer | #Farmers | #GuavaFarming | #Guava | #Nanded |
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
इतर बातम्या
Alert : या सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी करा हे काम, अन्यथा 17 दिवसांत बंद होईल कार्ड
Gudi Padwa 2021 | कधी आहे गुढीपाडवा, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी…