शवगृहात व्यवस्थापक पदासाठी नोकर भरती; अटी ऐकूनच उडेल थरकाप
प्रत्येक व्यक्तीसाठी नोकरी ही अत्यंत महत्त्वाची असते, नोकरीला आयुष्यातील सेफ झोन मानलं जातं. चांगल्या नोकरीसाठी अनेक जण दिवस रात्र अभ्यास करतात. खूप मेहनत करतात
प्रत्येक व्यक्तीसाठी नोकरी ही अत्यंत महत्त्वाची असते, नोकरीला आयुष्यातील सेफ झोन मानलं जातं. चांगल्या नोकरीसाठी अनेक जण दिवस रात्र अभ्यास करतात. खूप मेहनत करतात, कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात एक चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. नोकरीमधून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांना आपल्या आयुष्यातील सोप्न पूर्ण करायची असतात. लोकांना नोकरीची एवढी क्रेझ असते की चांगलं पॅकेज मिळत असेल तर लोक परदेशात जाण्यासाठी देखील तयार असतात.मात्र काही काही जॉब असे असतात की जे चर्चेचा विषय ठरतात. तुम्ही अशा जॉबची कधी कल्पाना देखील केली नसेल.
आज आपण आशाच एका नोकरीची बातमी पाहाणार आहोत, जिथे कितीही चांगली ऑफर असेल तरी तुम्ही नोकरीची ऑफर स्विकारण्यापूर्वी अनेकदा विचार कराल. अनेकजण तर हा जॉब करणार देखील नाही. ही नोकरी आहे शवगृहात व्यवस्थापकाची. मात्र यासाठीची जी अट आहे ती अशी आहे की, ज्या व्यक्तीचा अर्ज या नोकरीसाठी स्विकारला जाईल त्या व्यक्तीला कमीत कमी 10 मिनिटं शवगृहात ठेवलेल्या मृतदेहांसोबत राहावं लागणार आहे. मात्र शवगृहातील तापमान हे मायनसमध्ये असते.अशा स्थितीमध्ये माणूस दोन मिनिटे देखील तिथे थांबू शकत नाही. मात्र इथे दहा मिनिटं अशा स्थितीमध्ये थांबायचं आहे, ते पण मृतदेहांसोबत त्यामुळे अनेक जणांनी ही अट ऐकूनच नोकरीला नकार दिला आहे.
ही भरती निघाली आहे भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमध्ये या नोकरीसाठी तुम्हाला 2139.50 चीनी युआन इतका पगार मिळणार आहे. भारतीय चलनात बोलायचं झाल्यास या नोकरीसाठी तुम्हाला 25000 रुपये इतका पगार मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला शवगृहात मृतदेहांसोबत दहा मिनिट थांबण्याची अट पूर्ण करावी लागणार आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टनुसार चीनच्या शौंडोंग प्रांतामध्ये शवगृहाचा व्यवस्थापक या पदासाठी जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली आहे.या जाहिरातीमध्ये असं म्हटलं आहे की आम्हाला अशा लोकांची गरज आहे की जे मृतदेहांसोबत राहू शकतात. या पदासाठी ज्या अटी आहेत त्यामध्ये असं म्हटलं की ही शिफ्ट 24 तास रोटेश पद्धतीची असेल, तुम्हाला रात्री देखील मृतदेहांसोबत शवगृहात राहावं लागले, ज्या व्यक्तीची निवड होईल, त्या व्यक्तीला 2139.50 चीनी युआन इतका पगार मिळेल.