परीक्षेविना मिळत आहे नोकरीची सुवर्णसंधी, 34000 पर्यंत मिळेल पगार
एअर इंडियामध्ये नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) ने संपूर्ण भारतात सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) पदांसाठी अर्ज मागवले आहेत
मुंबई | 4 डिसेंबर 2023 : एअर इंडियामध्ये नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) ने संपूर्ण भारतात सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या तरूण-तरूणींना या पदांसाठी अर्ज करायची इच्छा आहे, ते उमेदवार 8 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी AAICLAS या aaiclas.aero या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तेथे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 906 पदे भरण्यात येणार आहेत. AAICLAS देशभरात सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर) पदांसाठी 3 वर्षांसाठी निश्चित मुदतीच्या आधारावर भरती करणार आहे.
पदांची संख्या :
या भरती मोहिमेद्वारे, सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर) च्या 906 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा :
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचे कमाल वय 27 वर्षे असावे. यापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही.
अर्ज शुल्क :
सामान्य तसेच ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये इतके आहे. तर महिला, SC/ST आणि EWS उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
आवश्यक कौशल्ये :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांन 60 % गुण आणि SC/ST उमेदवारांसाठी 55 % गुण मिळालेले असावेत.
असा करा अर्ज :
AAICLAS चे ऑफिशिअल पोर्टल aaiclas.aero वर जावे.
होमपेज वर करिअर टॅबवर जावे.
त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करावे.
रजिस्ट्रेशन करून अर्ज भरण्यासाठी पुढे जावे.
फॉर्म भरा, अर्जासाठीचे शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.