पदवीधरांसाठी शेवटची संधी, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच..

| Updated on: Jun 27, 2024 | 1:24 PM

SBI Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही शेवटची संधी तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही मोठी संधी आहे.

पदवीधरांसाठी शेवटची संधी, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच..
state bank of india
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरती किंवा मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही भरती राबवली जातंय. थेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 जागा या भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 म्हणजेच आज आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार हे भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. फक्त हेच नाही तर उमेदवाराकडे आयआयबीएफने दिलेले फॉरेक्समधील प्रमाणपत्र देखील असले आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 23 ते 32 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अगोदर अर्ज केलेल्या उमेदवारांनाचे शॉर्टलिस्टिंग केले जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्याचे टेन्शन नसणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही वाचण्यास मिळेल. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.