Bank : रिटायरमेंटनंतर ही या कर्मचाऱ्यांना पुन्हा लॉटरी, बँकेने दिली नोकरीची संधी..
Bank : निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी लागली आहे. ही बँक नोकरीची संधी देत आहे..
नवी दिल्ली : बँकेतून (Bank) निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना (Employees) बँकेत नोकरीची संधी (Job Opportunity) मिळाली आहे. बँकेने रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी खास नोकरीची ऑफर आणली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही या कर्मचाऱ्यांना आवडत्या बँकेत सेवा देण्याची संधी मिळाली आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी एसबीआयने अधिसूचना काढली आहे. sbi.co.in या संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
10 ऑक्टोबर 2022 रोजी पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना आता लेखी परीक्षा वा इतर पात्रता निकष पूर्ण करण्याची गरज नाही. केवळ मुलाखत देऊन या पदासाठी ते पात्र ठरणार आहे.
Resolver या पदासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संधी मिळणार आहे. कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये या निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवेची संधी मिळणार आहे. या पदासाठी शैक्षणिक योग्यतेपेक्षा अनुभव महत्वाचा आहे. चांगली वर्तणूक, बँकेच्या कार्यपद्धतीची माहिती हे या पदासाठी आवश्यक पात्रता आहे.
या पदावर बँका सेवेची संधी देत असली तरी हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना 1 ते 3 कामाची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर या पदासाठी कर्मचाऱ्यांना दावा करता येणार नाही. करार पद्धतीने या जागा भरण्यात येणार आहेत.
निवृत्त कर्मचाऱ्यांना sbi.co.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठी अर्ज करता येईल. 10 ऑक्टोबर पासून कर्मचाऱ्यांना या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.ही प्रक्रिया येत्या 31 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत सुरु राहणार आहे. मुलाखत ही 100 गुणांची असेल.
निवृत्त कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या श्रेणीत नोकरीची संधी देण्यात येणार आहे. या श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येणार आहे. साधारणपणे 40 हजार ते 45 हजार रुपये दरमहा असा पगार देण्यात येणार आहे.
एकूण 47 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 21, ओबीसीसाठी 12, एससीसाठी 7, एसटी उमेदवारांसाठी 3 आणि ईडब्ल्यूएस या वर्गासाठी 4 तर अपंगासाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.