Supreme Court Recruitment 2024 : सुप्रीम कोर्टात काम करण्याची पदवीधरांना संधी, 67 हजारापेक्षा अधिक पगार; अर्ज असा करा
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 107 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवार पर्सनल असिस्टंट, सीनियर पर्सनल असिस्टंट आणि कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)सारख्या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. निवड प्रक्रियेत स्किल टेस्ट, लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे. पगार 44,900 ते 67,700 रुपये प्रति महिना आहे.
नोकरीच्या शोधात आहात? मग तुमची वणवण संपलीय असं समजा. तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला थेट सुप्रीम कोर्टात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 100 हून अधिक पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यामुळे इच्छुकांना अर्ज करता येणरा आहेत. सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट sci.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार 25 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्या आधी अर्ज दाखल करू शकता.
सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकष्ठा करतात. पण काहींना यश मिळतं, तर काहींना मिळत नाही. मात्र, आता निराश होऊ नका. सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची तुम्हाला संधी आहे. सर्वोच्च न्यायालयाने जम्बो भरती काढली आहे. विशेष म्हणजे पदवीधरांसाठी ही भरती काढली आहे. पात्रतेत बसणाऱ्या उमेदवारांना नोकरीची आयतीच संधी मिळाल्याने तात्काळ अर्ज करून सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची तुमची इच्छा पूर्ण करू शकता.
एकूण 107 पदांसाठी ही भरती निघाली आहे. ग्रुप बी पर्सनल असिस्टंट पदासाठी यात सर्वाधिक भरती काढण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्सनल असिस्टंटच्या एकूण 43 पदांवर भरती काढण्यात आली आहे. तर सीनियर पर्सनल असिस्टेंटचे 33 पदे आणि कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)ची 31 पदांवर भरती होणार आहे. कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)चे पद हे गॅजेटेड ऑफिसरचं पद आहे.
Supreme Court Recruitment 2024 : पात्रता काय?
शैक्षणिक योग्यता – सुप्रीम कोर्टातील या वेगवेगळ्या पदांसाठीच्या भरतीसाठी वेगवेगळी पात्रता आहे. कोर्ट मास्टरच्या पदासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेची कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. तर सीनिअर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंटच्या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट – या पदांसाठी 30 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतो.
Supreme Court Vacancy 2024 : निवड प्रक्रिया कशी?
या पदांसाठीच्या निवड प्रक्रियेची सुरुवात स्किल टेस्टने होणार आहे. यात टायपिंग आणि शॉर्टहँडचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. त्यानंतर फायनल सिलेक्शन प्रक्रियेच्यावेळी कागदपत्रांची छाननी होईल. फिटनेस टेस्टही केली जाणार आहे.
Supreme Court Jobs 2024 : पगार किती?
कोर्ट मास्टर्स (शॉर्टहँड)- 67,700 रुपये महिना
सीनियर पर्सनल असिस्टंट- 47,600 रुपये महिना
पर्सनल असिस्टंट- 44,900 रुपये महिना