तलाठी भरती 2023 ची निवड यादी अखेर जाहीर, थेट जिल्हानिहाय यादी, तब्बल..

| Updated on: Jan 24, 2024 | 2:33 PM

Talathi Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांपासून तलाठी भरती 2023 तूफान चर्चेत आहे. तलाठी भरतीची चर्चा जोरदार रंगताना दिसली. या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचे देखील सतत सांगितले जाते. काही गंभीर आरोप देखील करण्यात आले. आता याच भरती प्रक्रियेबद्दलचे मोठे अपडेट पुढे येतंय.

तलाठी भरती 2023 ची निवड यादी अखेर जाहीर, थेट जिल्हानिहाय यादी, तब्बल..
Follow us on

मुंबई : तलाठी भरती 2023 ची निवड यादी जाहीर करण्यात आलीये. हेच नाही तर निवड यादीसोबतच प्रतिक्षा यादीही जाहीर केली गेलीये. महसूल विभागाकडून जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आलीये. गेल्या काही दिवसांपासून उमेदवार हे या यादीच्या प्रतिक्षेत होते. जिल्हा निवड समितीने तयार केलेली यादी जाहीर करण्यात आलीये. राज्यातील 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी आता जाहिर केली गेलीये. ही भरती प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच मोठ्या वादात सापडली होती. मात्र, आता प्रशासनाकडून तलाठी भरती 2023 ची निवड यादी जाहीर करण्यात आलीये.

विशेष बाब म्हणजे जिल्हा प्रतिक्षा यादी जाहिर करण्यात आलीये. यामध्ये 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 मुंबई शहर, 5 मुंबई उपनगर, 6 सातारा, 7 सांगली, 8 सोलापूर, 9 कोल्हापूर, 10 अकोला, 11 बुलढाणा, 12 वाशिम, 13 परभणी, 15 लातूर, 16 जालना, 17 वर्धा, 18 नागपूर, 19 गोंदिया, 20 भंडारा, 21 छ. संभाजी नगर, 22 धाराशिव, 23 हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फक्त हेच नाही तर वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही उमेदवारांची केली जाणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची नक्कीच आहे.

ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता यादीमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या कामाला लागावे लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ही अत्यंत आवश्यक नक्कीच आहे.

ही तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 च्या कालावधीत घेण्यात आली. विशेष म्हणजे तीन टप्प्यात ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज ही केली होती. त्यापैकी जवळपास 9 लाखांच्या आसपास उमेदवारांनी ही भरती प्रक्रिया दिली होती. टीसीएस कंपनीकडूनला या भरती प्रक्रियेसाठी काम देण्यात आले होते.