UPSC Mains Result 2020: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील 34 विद्यार्थी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीचे 34 विद्यार्थी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. Jamia Millia Islamia's Residential Coaching Academy
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं मंगळवारी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये गतवर्षी चर्चेत आलेल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीचे 34 विद्यार्थी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांची आता नागरी सेवा परीक्षा 2020 च्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांसाठी मुलाखत प्रक्रिया राबवेल. (Thirty four Students of Jamia Millia Islamia’s Residential Coaching Academy have cleared UPSC CSE Main 2020)
पुढील तयारी काय?
रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांकडून मुलाखतीची तयारी करुन घेण्यासाठी मुलाखतीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यासोबतच काही चर्चात्मक सत्रांचे आयोजन केले झाणार आहे. वरिष्ठ आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीमधील सुविधा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीमध्ये विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. यामध्ये सराव परीक्षा, ग्रंथालय, विशेष व्याख्यान आणि मुलाखतीची तयारी करुन घेतली जातेय.
गतवर्षी 30 विद्यार्थ्यांची निवड
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीचे 30 विद्यार्थी गेल्या वर्षाीच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. याशिवाय अकॅडमीचे 35 विद्यार्थी विविध राज्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जम्मू काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. आयबी, सीएपीएफ, आरबीआय आणि इतर राज्यांच्या परीक्षेत रेसिडेंशियल कोचिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे.
मुलाखतीसाठी लवकरच कळवले जाणार
आज नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल लागला असला तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाने उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती कधी होणार याबद्दल सांगितलेले नाही. उमेदवारांच्या मुलाखती या लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात होणार असून त्यासाठी लवकरच उमेदवारांना कळवले जाईल. त्यासाठी www.upsc.gov.in किंवा www.upsconline.in या वेबसाईट्ववर e-Summon Letter उपलब्ध करुन दिले जाईल. त्यानंतर मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार e-Summon Letter डाऊनलोड करु शकतील.
नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल कसा पाहावा?
>>> सर्वात आधी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
>>> होमपेजवर गेल्यानंतर Written Results या ऑप्शनवर क्लिक करा
>>> त्यानंतर Examination Written Result या ऑप्शनवर क्लिक करा
>>> त्यानंतर Civil Services (Main) Examination, 2020 या ऑप्सशनवर क्लिक करा, त्यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल दिसेल.
CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, https://t.co/eY5ehkjAw9 इथून डाऊनलोड कराhttps://t.co/udZjsXLcIV#cmat | #CMAT2021 | #CMATAdmitcard | #NTA
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेला थोड्याच वेळात सुरुवात, विद्यार्थ्यांसह आयोगाचीही परीक्षा
(Thirty four Students of Jamia Millia Islamia’s Residential Coaching Academy have cleared UPSC CSE Main 2020)