RRB Group D Exam : हा आहे ग्रुप डी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम, जाणून घ्या प्रत्येक तपशील
आरआरबी ग्रुप डीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात संगणक-आधारीत परीक्षा असते. तर दुसर्या टप्प्यात शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाते. (This is the pattern and syllabus of RRB Group D exam, know every detail)
नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळ एप्रिलमध्ये ग्रुप डी परीक्षा सुरू करू शकतो. रेल्वेने जारी केलेल्या नोटीसनुसार ग्रुप डीची परीक्षा एप्रिल ते जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. सध्या रेल्वेची आरआरबी एनटीपीसी परीक्षा चालू आहे, त्यानंतरच ग्रुप डीची परीक्षा सुरू होईल. एनटीपीसीची 5 वी टप्प्यातील परीक्षा 27 मार्चपर्यंत चालणार आहे. यानंतर सहाव्या टप्प्यातील परीक्षा होईल. यानंतर, आरआरबी ग्रुप डी परीक्षेची तारीख (आरआरबी ग्रुप डी परीक्षेची तारीख)(RRB Group D Exam Date) रेल्वेनेकडून जाहीर केली जाईल. या परीक्षेसाठी दीड कोटी विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. (This is the pattern and syllabus of RRB Group D exam, know every detail)
आरआरबी ग्रुप डीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात संगणक-आधारीत परीक्षा असते. तर दुसर्या टप्प्यात शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाते. सीबीटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीत भाग घेण्याची संधी मिळते. शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते, त्यानंतर उमेदवारांची नेमणूक केली जाते.
RRC Group D परीक्षा पॅटर्न
– ग्रुप डी कॉम्प्युटर बेस्ट टेस्टमध्ये 100 प्रश्न विचारले जातील. सीबीटी 100 गुणांचे असेल.
– परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल, 3 प्रश्न चुकीचे असल्यास 1 गुण वजा केला जाईल.
– उमेदवारांना परीक्षेसाठी 90 मिनिटे दिली जातील.
RRB Group D अभ्यासक्रम
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क
अॅनालॉजीज, वर्णमाला व संख्या मालिका, कोडिंग आणि डिकोडिंग, गणितीय ऑपरेशन, संबंध, शब्दलेखन, जंबलिंग, व्हेन डायग्राम, डेटा व्याख्या आणि सुरक्षा, समानता आणि फरक, विश्लेषणात्मक तर्क, वर्गीकरण, दिशानिर्देश, स्टेटमेन्ट, स्टेटमेंट- लॉजिक आणि गृहीतके इ.
सामान्य विज्ञान
दहावी इयत्तेचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करा.
जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर
चालू घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ, संस्कृती, व्यक्ती, अर्थशास्त्र, राजकारण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सामान्य जागरूकता वाचा. (This is the pattern and syllabus of RRB Group D exam, know every detail)
Holashtak 2021 | होलाष्टकादरम्यान चुकूनही करु नका ‘ही’ कामं…https://t.co/CsLvzWno56#Holashtak2021 #Holi2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
इतर बातम्या
विरारमध्ये चेन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी अटकेत, 5 लाख 74 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त