Saraswat Bank BDO Application 2021 : सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

सारस्वत बँक व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मार्च 2021 पासून सुरू झाली होती. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि नवी दिल्ली, भारत या राज्यांत उमेदवारांची पोस्टिंग केली जाईल. (Today is the last day to apply for the post of Business Development Officer in Saraswat Bank)

Saraswat Bank BDO Application 2021 : सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 7:37 AM

नवी दिल्ली : सरकारी बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी सूचना आहे. देशातील सर्वात मोठी सहकारी बँक सारस्वत सहकारी बँक लिमिटेडच्या विविध विभागात मार्केटिंग / विक्रीचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी 150 व्यवसाय विकास अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे. या पदासाठी अर्ज करण्याचा आज 31 मार्च 2021 रोजी शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेले नाही ते बँकेची अधिकृत वेबसाईट saraswatbank.com वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे अर्ज करू शकता. सारस्वत बँक व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मार्च 2021 पासून सुरू झाली होती. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि नवी दिल्ली, भारत या राज्यांत उमेदवारांची पोस्टिंग केली जाईल. (Today is the last day to apply for the post of Business Development Officer in Saraswat Bank)

जाणून घ्या पात्रतेचे निकष

सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50% गुणांसह कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना बँक किंवा एनबीएफसीमध्ये विक्री आणि मार्केटिंग क्षेत्रात कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त, 1 फेब्रुवारी 2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत जनरल/फायन्शियल अवेअरनेस, सामान्य इंग्रजी, रिझनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्युड आणि प्रोफेशनल नॉलेज – मार्केटींग विषयांत एकूण 190 प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षा 200 गुणांची असेल आणि परीक्षेचा कालावधी 160 मिनिटे असेल. परीक्षा इंग्रजी भाषेत घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 50% गुण मिळवलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.

किती असेल अर्जाचे शुल्क?

सारस्वत बँक व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी 750 रुपये शुल्क आकारण्यात येईल. सारस्वत बँक अधिसूचना 2021 नुसार डेबिट / क्रेडिट कार्ड / युपीआय / नेट बँकिंग किंवा अन्य कोणत्याही ऑनलाईन मोडद्वारे फी भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पगार किती?

व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,620 रुपये ते 23,300 रुपये वेतन देण्यात येईल. (Today is the last day to apply for the post of Business Development Officer in Saraswat Bank)

इतर बातम्या

मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो

NPCIL Recruitment 2021 : अणु ऊर्जा महामंडळात सरकारी नोकरीची भरती, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी करा अर्ज

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.