UPSC CSE Exam 2021: नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची यूपीएससीकडे मागणी, ट्विटरवर मोहीम सुरु
देशभरातील विविध परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. UPSC CSE Aspirants covid
नवी दिल्ली: भारताला कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. देशभरातील विविध परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा 27 जून रोजी प्रस्तावित आहे. (UPSC CSE Aspirants requested to postpone CSE Pre exam due to covid )
यूपीएसीची भूमिका काय?
विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावरुन परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगानं ही परीक्षा लांबणीवर टाकण्याबाबत कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पूर्व परीक्षेसाठी 4 मार्च ते 24 मार्च दरम्यान अर्ज स्वीकारण्यात आले होते.
Hon’ble @DrJitendraSingh We are kindly requesting you to postpond #UPSC Prelims 2021 as the second wave is becoming extreme day by day, our routine is hampered. We need some time to settle mentally, to educate in terms of CSE?#UPSCexampostpone #UPSCExtraAttempt2021 #PLEASE
— Hari Krishna Ilango (@h_kay006) May 8, 2021
कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षेवर प्रश्नचिन्ह
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी 27 जून ही तारीख निर्धारीत केली आहे. सध्याची देशातील विविध राज्यांमधील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहता सर्व राज्यांमध्ये एका वेळी परीक्षेचे आयोजन कसे करणार याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.
Hon’ble @DrJitendraSingh We are kindly requesting you to postpond #UPSC Prelims 2021 as the second wave is becoming extreme day by day, our routine is hampered. We need some time to settle mentally, to educate in terms of CSEFolded hands#UPSCexampostpone
— Er.BIKKU SINGH (@bikku_kumar) May 9, 2021
जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निर्णय
कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि परीक्षा आयोजनासाठी उपलब्ध असलेला वेळ पाहता केंद्रीय लोकसेवा आयोग जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात पूर्व परीक्षेबाबत विचार करु शकते. अद्याप यूपीएससीनं परीक्षा रद्द करणे किंवा लांबणीवर टाकणे याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं प्रवेशपत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
संबंधित बातम्या:
UPSC Civil Service 2020 उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!
साताऱ्याच्या पट्ठ्याची कमाल, UPSC परीक्षेत देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला, वाचा यशोगाथा…
UPSC CSE Aspirants requested to postpone CSE Pre exam due to covid