दर दोन महिन्यांनी शरीराचा कोणता भाग (Body Parts) बदलतो हे तुम्हाला माहीत आहे का? आपण विचार करत असाल की असा कोणता अवयव आहे जो आपल्याला कधी बदलतो हे देखील माहित नाही. असे अनेक गोंधळून (Confusing) टाकणारे प्रश्न आयएएसच्या मुलाखतीत (IAS Interview) विचारले जातात. अशा प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांचं अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण होतं. यूपीएससीच्या मुलाखतीत येणाऱ्या उमेदवारांनी ज्ञानाबरोबरच आजूबाजूच्या गोष्टींचीही सखोल माहिती ठेवावी. शिवाय तार्किक प्रश्नांची उत्तरेही त्यांना कळायला हवीत. आज आम्ही तुम्हाला नागरी सेवा मुलाखतीत विचारायचे काही प्रश्न सांगत आहोत. यामुळे मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची कल्पना येईल. अनेक जण मुलाखतीच्या अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकतात. बघुयात कोणते असे ट्रिकी प्रश्न आहेत.
दर 2 महिन्यांनी शरीराचा कोणता भाग बदलतो?
उत्तर – माणसाचं मन दर दोन महिन्यांनी बदलतं, तर संपूर्ण शरीर बदलायला साधारण 5-7 वर्षं लागतात.
जगातील कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत आहे?
उत्तर : वाघाची हाडे सर्वात मजबूत असतात.
जे फळ बाजारात मिळत नाही ते फळ कोणते?
उत्तर : संयम आणि मेहनतीचे फळ बाजारात मिळत नाही.
कोणत्या देशात तुरुंगातून पळून जाण्यासाठी शिक्षा नाही?
उत्तर : जर्मनीत कैदी तुरुंगातून पळून गेल्यावर त्याला वेगळी शिक्षा दिली जात नाही, तर त्याला पकडून पुन्हा तुरुंगात आणले जाते.
तापवल्यावर ती घनरूप होते, अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर : अंडं तापवलं की ते वितळण्याऐवजी घट्ट होतं.
सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सर्वात जास्त अंतर कोणत्या दिवशी आहे?
उत्तर : 4 जुलै रोजी सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये जास्तीत जास्त अंतर असते.
कोणत्या लाकडाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे?
उत्तर : लाल चंदन अत्यंत मौल्यवान आहे.
बुडल्यावर कोणी वाचवत नाही अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर: सूर्य
असे काय आहे जे खाण्यासाठी विकत घेतले जाते परंतु खाऊ शकत नाही?
उत्तर- प्लेट
माशीच्या तोंडात किती दात असतात?
उत्तर : माशीच्या तोंडात एकही दात नसतो.