UPSC Jobs 2023 : भावा लागणार लॉटरी! युपीएससीने काढली बंपर पद भरती, धडाधड करा अर्ज

UPSC Jobs 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने पद भरती जाहीर केली आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही स्वतःला आता सिद्ध करा.

UPSC Jobs 2023 : भावा लागणार लॉटरी! युपीएससीने काढली बंपर पद भरती, धडाधड करा अर्ज
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली : नोकरीची संधी शोधत असणाऱ्यांना तरुणांना मोठी संधी चालून आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी भरतीची (UPSC Recruitment 2023) अधिसूचना काढली आहे. तज्ज्ञ श्रेणी III, सहायक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पदासाठी अर्ज करावा. या पद भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जून निश्चित करण्यात आली आहे. तर उमेदवार 30 जूनपर्यंत अर्ज प्रिंट करु शकतात. upsconline.nic.in याविषयीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

या पदासाठी अर्ज प्रक्रिया

  • या भरती प्रक्रियेत एकूण 113 रिक्त पदे भरता येतील
  • स्पेशलिस्ट ग्रेड III (माइक्रोबायोलॉजी वा बॅक्टिरियालॉजी) : 26 पद
  • तज्ज्ञ ग्रेड III (पॅथॉलॉजी) : 15 पद
  • सहाय्यक शल्यचिकित्सक /वैद्यकीय अधिकारी : 2 पद
  • खणिजकर्म ज्येष्ठ सहायक नियंत्रक : 2 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (शरीरशास्त्र) : 6 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (सामुदायिक औषध) : 4 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी) : 4 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (स्त्रीरोग आणि प्रसूती) : 4 पद
  • सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (होमिओपॅथिक मटेरिया मेडिका) : 8 पद
  • सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (होमिओपॅथिक फार्मसी) : 5 पद
  • सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन) : 9 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (वैद्यकशास्त्राचा सराव) : 7 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (बायोकेमिस्ट्रीसह शरीरविज्ञान) : 5 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी) : 4 पद
  • सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (रेपर्टरी) : 8 पद
  • सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (शस्त्रक्रिया) : 4 पद

इतके आहे शुल्क या पदांना अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत शुल्काचा भरणा करावा लागेल. अर्थात आता नवीन तांत्रिक आयुधांसह त्यांना शुल्क भरता येईल. उमेदवार नेट बँकिंगचा वापर करु शकतो. तो व्हिसा, मास्टर, रुपे, क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करुन या पदासाठी शुल्क जमा करु शकतो. या पदासाठी अर्जदाराला केवळ 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर अनुसूचित जाती, जमाती, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांना अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यांना शुल्क सवलत जाहीर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

याठिकाणी करा क्लिक तर वय, इतर अर्हता, आरक्षण आणि इतर माहितीसाठी, सविस्तर तपशीलासाठी उमेदवारांना युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. याविषयीची अधिसूचना युपीएससीने काढली आहे. त्यामध्ये प्रत्येक पदासाठी अर्ज करण्याची विस्तृत, तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तुमच्या मनातील सर्व शंका याठिकाणी दूर होतील. तुम्हाला युपीएससीने जाहीर केलेली अधिसूचना या ठिकाणी क्लिक करुन पाहता येईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.