NPCIL Recruitment 2021 : अणु ऊर्जा महामंडळात सरकारी नोकरीची भरती, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी करा अर्ज

तांत्रिक अधिकारी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल), वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ आणि जीडीएमओ), उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि स्टेशन अधिकारी या पदासाठी भरती केली जाईल. (vacancy in Nuclear power corporation for technical officer and other post)

NPCIL Recruitment 2021 : अणु ऊर्जा महामंडळात सरकारी नोकरीची भरती, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी करा अर्ज
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 4:20 PM

नवी दिल्ली : अणु क्षेत्रातील सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या अणु उर्जा विभागांतर्गत आणि देशात आण्विक उर्जा प्रकल्प चालवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) ने 72 पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. कंपनीने दिलेली जाहिरात क्र NPCIL/HRM/2021/02 नुसार तांत्रिक अधिकारी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल), वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ आणि जीडीएमओ), उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि स्टेशन अधिकारी या पदासाठी भरती केली जाईल. (vacancy in Nuclear power corporation for technical officer and other post)

एकूण 72 पदांसाठी भरती

एनपीसीआयएल भर्ती 2021 च्या जाहिरातानुसार, जाहिरात करण्यासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनपीसीआयएलने अधिकृत वेबसाईट npcilcareers.co.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि उमेदवार 20 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. एनपीसीआयएलच्या जाहिरातीनुसार कंपनीने जाहीर केलेल्या विविध पदांसाठी एकूण 72 रिक्त पदांचा समावेश आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी (तज्ज्ञ)च्या रिक्त जागांमध्ये फिजिशियन, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन, डेंटल सर्जन आणि रेडिओलॉजिस्ट या पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांचा तपशील

टेक्निकल ऑफिसर (मेकेनिकल) – 28 पद टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल) – 10 पद टेक्निकल ऑफिसर (सिविल) – 12 पद मेडिकल ऑफिसर (स्पेशालिस्ट) – 8 पद मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) – 7 पद डिप्टी चीफ फायर ऑफिसर – 3 पद स्टेशन ऑफिसर – 4 पद

अर्ज प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी वेबसाईट पहा

तथापि, एनपीसीआयएलने जाहीर केलेल्या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. या तपशीलांसाठी उमेदवारांनी कंपनीच्या भरती पोर्टल तसेच अधिकृत वेबसाईट npcil.nic.in वर वेळोवेळी भेट द्या. (vacancy in Nuclear power corporation for technical officer and other post)

इतर बातम्या

LIC च्या ‘या’ विशेष पॉलिसीमध्ये 31 मार्चपूर्वी करा गुंतवणूक, मोठे फायदे मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.