पुणे : राज्य गुन्हे अन्वेषन विभागात (CID) काम करण्याची तुमची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी नक्कीच सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे. राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या पुणे कार्यालयात कंत्राटी पद्धतीने (Contract Basis) पद भरण्यात येणार आहे. अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयात विधी अधिकारी (गट-ब) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागू करण्यात आलेल्या अटींमध्ये आणि शैक्षणिक पात्रतेत बसणाऱ्या योग्य उमेदवारांनी अर्ज भरावा. या पदाची जागा 11 महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
पदाचं नाव – विधी अधिकारी (गट-ब), गुन्हे अन्वेषन विभाग पुणे
एकूण पदे – 01
मासिक वेतन, दूरध्वनी आणि प्रवास खर्च – 25,000 रु. + 3000 रु.
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त कायद्याचा पदवीधर असावा. उमेदवाराचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळणारी व्यक्ती, गुन्हेगारी प्रशासकीय आणि सेवांविषयक कायद्यांविषयी सखोल ज्ञान असणारी व्यक्तीच या पदासाठी पात्र असेल.
1) राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या www.mahacid.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला अर्ज भरून तो लिफाफ्यात भरावा.
3) लिफाफ्याच्या उजव्या बाजूला ठळक अक्षरात ” कंत्राटी विधी संवर्गाच्या पदांसाठी अर्ज” असं लिहा.
4) हा अर्ज 20 एप्रिल 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत ( सकाळी 09.45 ते सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत ) खालील पत्त्यावर पोहचेल याची दक्षता घ्यावी.
पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी चव्हाणनगर, पुणे- 411008
१) 20 एप्रिल 2022 ला म्हणजेच शेवटच्या तारखेला सांयकाळी 06.15 नंतर आलेला अर्ज कोणत्याही परिस्थिती स्विकारला जाणार नाही.
२) आपल्या अर्जात दूरध्वनी क्रमांक, इमेल आयडी आणि आपला पत्ता नमूद करावा.
३) पदासाठीची शैक्षणिक पात्रता, अनुभव, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या त्याचबरोबर अर्जदाराने अर्जासोबत द्यायचे प्रतिज्ञापत्र याबाबतची सविस्तर माहिती www.mahacid.gov.in या राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
इतर बातम्या :