Deputy Governor : कोण, केव्हा आणि कसं होऊ शकतं RBI चे डेप्युटी गव्हर्नर

Deputy Governor : देशाची सर्वोच्च आर्थिक आणि बँकिंग नियंत्रण करणारी संस्था, आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरची प्रक्रिया कशी होते? तुम्हाला माहिती आहे का?

Deputy Governor : कोण, केव्हा आणि कसं होऊ शकतं RBI चे डेप्युटी गव्हर्नर
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 7:46 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर (RBI Deputy Governor) पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी झाल्या. 1 जून रोजी ही प्रक्रिया पार पडली. केंद्रीय बँकेतील 4 डेप्युटी गव्हर्नरपैकी एक एम. के. जैन यांचा कार्यकाळ जूनपर्यंतच आहे. या रिक्त पदी नियुक्तीसाठीची प्रक्रिया अगोदरच सुरु झाली होती. मार्च महिन्यात याविषयीची पहिली अधिसूचना देण्यात आली. तर प्रत्येकाच्या मनात हे कुतूहल असतेच की ही निवड अखेर होती कशी? या पदासाठी अखेर पात्र तरी कोण असतं. त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असते? यासंबंधीची ही माहिती रोचक ठरेल.

कोण होऊ शकतं RBI चं डेप्युटी गव्हर्नर या पदासाठी केंद्र सरकारने काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात या पद भरतीची अधिसूचना काढण्यात आली होती. या पदासाठी अर्ज करताना त्यांची पुर्तता करणे आवश्यक आहे. पदासाठी कमीत कमी 15 वर्षांचा बँकिंग आणि फायनेन्शिअल मार्केट ऑपरेशन्सचा अनुभव असणे आवश्यक आहे. खासगी क्षेत्रातील पात्र व्यक्ती अर्ज करु शकतात.

काय आहे प्रक्रिया केंद्रीय बँकेचे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. यामध्ये एक व्यावसायिक बँकर असतो. एक अर्थतज्ज्ञ असतो. डेप्युटी गव्हर्नरची निवड प्रक्रिया सर्वसाधारण निवड प्रक्रियेनुसार होते. कोणत्याही डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर सरकार याविषयीची अधिसूचना काढते. अर्थ क्षेत्रातील निवड समिती पुढची प्रक्रिया पूर्ण करते. समिती अर्हतेसंबंधी काही बदल करु शकते. निवड झालेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यू पॅनलसमोर मुलाखत द्यावी लागते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, कॅबिनेच सेक्रेटरी, डीएफएस सेक्रेटरी आणि सीईए सेक्रेटरी यांचं यावेळी मुलाखत घेतील.

हे सुद्धा वाचा

हे आहेत शर्यतीत एसबीआयचे एमडी जे. स्वामीनाथन, युनियन बँकेचे चेअरमन व्ही. श्रीनिवासन, बँक ऑफ महाराष्ट्राचे ए. एस. राजीव, इंडियन बँकेचे एमडी शांती लाल जैन, युको बँकेचे एमडी सोम संकर प्रसाद हे या पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

काय आहेत अटी

  1. अर्जदाराकडे पूर्णवेळ संचालक अथवा संचालक मंडळाचा सदस्य म्हणून कामाचा अनुभव हवा
  2. आर्थिक क्षेत्रातील वरिष्ठ पदाचा, कामाचा, मनुष्यबळ हाताळण्याचा अनुभव गाठीशी असावा
  3. सार्वजनिक योजना, आर्थिक क्षेत्राशी संबंधित सखोल ज्ञान असणे आवश्यक
  4. या पात्र व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे
  5. हे पद मोठी जबाबदारी असल्याने अनुभव आणि इतर व्यावसायिक मुल्यांची जाण हवी
  6. डेप्युटी गव्हर्नर पदासाठी 3 वर्षांकरीता निवड होते
  7. इतर अनुषांगिक सुविधांसह 2.25 लाख रुपये प्रति महिना वेतन प्राप्त होते

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.