धक्कादायक… तीन जिल्ह्यात तीन अपघात, 9 जणांचा मृत्यू, काळाचा…

आजचा वार अपघातवार ठरला आहे. आज तीन जिल्ह्यात तीन अपघातात 9 लोकांनी आपला जीव गमावला आहे. नांदेडमध्ये सिमेंट नेणाऱ्या ट्रकची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. तर मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवडच्या राहूड जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघातामध्ये 5 प्रवाशांनी जीव गमावला.

धक्कादायक... तीन जिल्ह्यात तीन अपघात, 9 जणांचा मृत्यू, काळाचा...
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 11:07 AM

आजचा वार अपघातवार ठरला आहे. आज तीन जिल्ह्यात तीन अपघातात 9 लोकांनी आपला जीव गमावला आहे. नांदेडमध्ये सिमेंट नेणाऱ्या ट्रकची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. तर मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवडच्या राहूड जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघातामध्ये 5 प्रवाशांनी जीव गमावला. एवढंच नव्हे तर कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील सिद्धलिंग महाराज मठाच्या रथोत्सवात दुर्घटना घडली. इंडि तालुक्यातील लच्याण गावात रथ अंगावरून गेल्याने 3 भाविकांचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. या तीन दुर्दैवी घटनांमध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला.

नांदेडमध्ये सिमेंटच्या ट्रकची ८ बाईक्सना धडक

नांदेडमध्ये सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकची 8 दुचाकींना धडक बसून भीषण अपघात झाला. या भयानक अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ट्रकने ८ ते १० बाईक्सना जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सिमेंट घेऊन जाणाऱ्या या ट्रकची आठ मोटरसायकलना धडक बसली. भोकर नांदेड महामार्गावर आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सिद्धलिंग महाराज मठाच्या रथोत्सवात दुर्घटना , रथ अंगावरून गेल्याने 3 भाविकांचा मृत्यू

तर दुसरी घटना कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील लच्याण गावात घडली. या गावात सिद्धलिंग महाराज मठाच्या रथोत्सवात हा दुर्दैवी प्रकार घडला. इंडि तालुक्यातील लच्याण गावात रथ अंगावरून गेल्याने 3 भाविकांचा मृत्यू झाला. रथोत्सवादरम्यान दोरखंड तुटून रथ अंगावर गेल्याने 3 भाविकांना जीव गमवावा लागला. बंडप्पा कटकधोंड, शोभू कटकधोंड आणि अभिषेक मुजगुंड हे तीन भाविक चेंगरून मृत पावले. 100 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेच्या रथोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि तामिळनाडूतून जवळपास 2 लाख भाविक उपस्थित असतात.

मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघात

तर तिसरा अपघाता हा मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूडजवळ झाला. तेथे एसटी-ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई -आग्रा महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.