Mumbai Crime : 10 वर्षांच्या मुलाने उडवली मुंबई पोलिसांची झोप, कामच असं केलं की…

एअरपोर्टवरील विमानात बॉम्ब असल्याचा एका फोन मुंबई पोलिसांना आला आणि चांगलीच तारांबळ उडाली. त्यानतंर विमानतळ परिरसरात तातडीने शोधमोहिम राबवण्यात आली. अखेर...

Mumbai Crime : 10 वर्षांच्या मुलाने उडवली मुंबई पोलिसांची झोप, कामच असं केलं की...
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 4:50 PM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : एका 10 वर्षांच्या मुलाने केलेल्या कॉलमुळे मुंबई पोलिसांची (mumbai police) चांगलीच धावपळ उडाली. मुंबई एअरपोर्टवर बॉम्ब (bomb) असल्याचे त्या मुलाने फोनवरून सांगितल्यावर तातडीने शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र त्यात काहीच न सापडल्याने हा एक फसवणूक (haux call) करणारा कॉल असल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यात राहणाऱ्या एका मुलाने 112 या पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक वर फोन केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती या मुलाने फोनवरून पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने शोधमोहिम राबवत पोलिसांनी तपास केला. मात्र त्यात काहीच निष्पन्न झाले नाही, कुठेही बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे हा एक फसवणूक करणारा कॉल असल्याचे घोषित करण्यात आले. 10 तासांनंतर टेकऑफ करणाऱ्या विमानात हा बॉम्ब असल्याचे त्या मुलाने सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे प्रकरण एका लहान मुलाशी संबंधित असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. साधारणपणे असे हॉक्स कॉल केल्यावर पोलिस आरोपींवर गुन्हा दाखल करतात. तथापि, मुलांशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये, त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते जेणेकरुन भविष्यात ते आपल्या मुलांना अशा प्रकारचे कॉल्स करण्यापासून रोखतील. तसेच बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा पर्यायही पोलिसांकडे आहे.

मुंबईत हॉक्स कॉलची ही पहिलीच घटना नाही. सुमारे महिनाभरापूर्वी मुंबई पोलिसांना असाच एक फसवा फोन आला होता. 2008 मध्ये झालेल्या 26/11 बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर हल्ला होणार असल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.