क्रौर्याला सीमाच नाही ! 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या, कोल्हापूर हादरलं

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आहे. ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची नृशंस घटना शहरात घडली आहे.

क्रौर्याला सीमाच नाही ! 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या, कोल्हापूर हादरलं
crime
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 6:03 PM

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आहे. ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची नृशंस घटना शहरात घडली आहे.

कोल्हापूरच्या शिये गावातील राम नगर परिसरातील धक्कादायक घटना आहे. पीडित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 10 वर्षांची ही मुलगी काल दुपारपासूनच बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर आज सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. हत्या करण्यापूर्वी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

दरम्यान या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अधीश्रक महेंद्र पंडित हे घटनास्थळी दाखल झाले असून ते संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.

एकीकडे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमहोत असतानाच कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या शिये गावात मात्र घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असू श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू असून यामध्ये इतर आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.