शेजाऱ्यांनी केक देऊन फसवलं, 12 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकललं, ‘त्या’ व्हॉट्सअॅप ग्रुपचा शोध सुरु!

धक्कादायक म्हणजे शेजारीच राहणाऱ्यांनी या मुलीला फसवल्याचं समोर आलं आहे. वेश्याव्यवसाय चालवणारं हे रॅकेट असून, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे हा खेळ सुरु असल्याचं उघड झालं आहे.

शेजाऱ्यांनी केक देऊन फसवलं, 12 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकललं, 'त्या' व्हॉट्सअॅप ग्रुपचा शोध सुरु!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 11:38 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीमध्ये (South-West Delhi) एका 12 वर्षीय मुलीला अपहरण करुन, तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक घटना घडली. (12 Year Girl Kidnapped) पोलिसांनी या मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी 2 महिलांसह 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे शेजारीच राहणाऱ्यांनी या मुलीला फसवल्याचं समोर आलं आहे. वेश्याव्यवसाय चालवणारं हे रॅकेट असून, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे हा खेळ सुरु असल्याचं उघड झालं आहे. पोलीस आता या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मेंबर्सचा शोध घेत आहेत.  (12 years girl pushed into Prostitution after kidnapped)

यावर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुलीला सिगरेटचे चटके दिले, तिला भयंकर त्रास देऊन, वेश्याव्यवसायात (Prostitution)ढकललं. त्यामुळे अनेक पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत दक्षिण-पश्चिम दिल्लीत राहते. ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी 21 जानेवारीला त्याची तक्रार पोलिसात केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन घेतला होता.

केकच्या आमिषाने अपहरण

या मुलीला केकचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं होतं. ही मुलगी आपल्या घराजवळच्या दुकानात चिप्स घेण्यासाठी निघाली होती. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी तिला केकचं आमिष दाखवलं. त्यानुसार तिला एका घरात घेऊन गेले. तिथे तिला केक दिला. केक खाल्ल्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर तीचं अपहरण करुन तिला वेश्याव्यवसायात ढकललं.

दोन शेजारीही सामील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये दोन शेजाऱ्यांचाही समावेश आहे. ज्या चार आरोपींना अटक केली आहे त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. हे चौघेही वेश्याव्यवसायाचं रॅकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या रॅकेटने अन्य काही मुलांचं अपहरण केलंय का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर गिऱ्हाईक

या रॅकेटने व्हॉट्सअॅप ग्रुप करुन गिऱ्हाईकांपर्यंत पोहोचलं जातं. पोलीस आता त्या आरोपींपर्यंत पोहोचत आहेत, ज्यांनी चिमुकलीवर अत्याचार केला. या व्हॉट्सअॅप ग्रुपमधीलच काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

संबंधित बातम्या 

13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत विवाह, सुहागरात आणि वैधव्याचं नाटक, लग्न जुळवण्यासाठी शिक्षिकेचा उपद्व्याप

अभिनेत्याकडून तब्बल 50 लाखाच्या नकली नोटा जप्त, पोलिसांकडून बेड्या, फिल्मी दुनियेत खळबळ

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.