सांगलीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एक आरोपी अटकेत

एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

सांगलीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एक आरोपी अटकेत
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 9:35 PM

सांगली : मिरज शहरातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरूनच एका आरोपीला तात्काळ अटक केली असून पोक्सोनुसार (POCSO) कारवाई सुरु असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (13-year-old minor girl raped in Miraj-Sangli)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेत राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आरोप केला आहे की, “माझ्या मुलीला घराजवळून जबदस्तीने उचलून नेण्यात आलं. चार तरुणांनी मिळून मिरजेतील मास्टरशेफ हॉटेलाच्या मागील बाजूस एका रुममध्ये तिला नेलं, तिथे तिला इंजेक्शनद्वारे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं. मुलगी बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला. कामील नदाफ, फरहान ढालाईत, फुरकान, आणि फारूक ढालाइत अशी आरोपींची नावे आहेत. या चार आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.

शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या सुनीता मोरे यांनी पीडित मुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर सुनीता मोरे म्हणाल्या की, या प्रकरणातील चारही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. चारपैकी एक जण पोक्सोअंतर्गत (POCSO – Protection of Children from Sexual Offences) एका गुन्ह्यातील आरोपी आहे तर दुसरा मिरज येथे झालेल्या दंगलीतील आरोपी आहे. याप्रकरणी पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावण्याचे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी चारही आरोपींवर कडक कारवाई करावी. जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणात लक्ष घालावे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला धोका असल्याचेही मोरे म्हणाल्या.

पीडित मुलीची प्रकृती नाजूक आहे, तिच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुर आहेत. लवकरच चारही आरोपींवर कारवाई केली जावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करु असा इशारा सुनीता मोरे यांनी दिला आहे.

मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार म्हणाले की, मुलीच्या फिर्यादीवरुन, तिला विश्वासात घेऊन तिचा जबाब नोंदविला आहे. फरहान ढालाईत या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 363, 342, 354, 376, 504 आणि पोक्सोअंतर्गत (बाल लैंगिक अत्याचार-अपराध विरोधी कायदा) गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपांखाली आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. पीडितेच्या पालकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन सांगाव्यात, त्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल.

इतर बातम्या

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

आधी टिकटॉकवर ओळख, नंतर महिलेकडून मुलावर बलात्कार; प्रकार लक्षात येताच वडिलांची पोलिसात धाव

(13-year-old minor girl raped in Miraj-Sangli)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.