Buldana | आईच्या कुशीत झोपलेल्या 13 वर्षांच्या मुलाला वडिलांनी संपवलं, कारण…

घराजवळच असलेल्या नदीपात्रात निर्दयीपणे गळा दाबून त्यानं आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाची हत्या केल्यानं सिद्धेश्वरनं आपल्या मुलाचा मृतदेह नदीत फेकून दिला होता.

Buldana | आईच्या कुशीत झोपलेल्या 13 वर्षांच्या मुलाला वडिलांनी संपवलं, कारण...
वडिलांनीच केली मुलाची हत्या
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 7:59 PM

बुलडाणा : आईच्या कुशीत साखरझोपेत असलेल्या चिमुकल्याला लघवीसाठी बाहेर जायचंय म्हणून उठवून एका बापानं आपल्याच मुलाची गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. ही धक्कादायक घटना बुलडाणा (Buldana) जिल्ह्याच्या सिंदखेड राजा (Sindkhed Raja)  तालुक्यात घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या बापाला अटकही केली असून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

…म्हणून मुलाचा गळा घोटला

बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेत राजा तालुक्यातील सवडद गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय सिद्धेशव सखाराम नन्हई गेल्या काही दिवसांपासून दररोज आपल्या पत्नी आणि मुलांना त्रास देत होता. पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन सिद्धेश्वर यांनं दोन्ही मुलं आपली नसून दुसऱ्याची असल्याचा गंभीर आरोप बायकोवर लावला होता. सिद्धेश्वर यांना 5 वर्षांची एक मुलगी आणि 13 वर्षांचा एक मुलगा आहे.

मृतदेह नदीत फेकला

13 वर्षांचा मुलगा आईच्या कुशीत साखर झोपेत होता. तेव्हा सिद्धेश्वर यांने त्याला उठवून लघवीसाठी बाहेर नेलं. यानंतर घराजवळच असलेल्या नदीपात्रात निर्दयीपणे गळा दाबून त्यानं आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाची हत्या केल्यानं सिद्धेश्वरनं आपल्या मुलाचा मृतदेह नदीत फेकून दिला होता. या संतापजनक प्रकारानं सगळ्यांना धक्का बसला असून पोलिसांनी या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या बापाला अटक केली आहे.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर यानं हे हत्याकांड केलं. यानंतर त्यानं मुलाला जीवे मारल्याचं जाहीरपणे मान्यही केलं होतं. दरम्यान, अमरचा शोध मात्र मिळू शकला नव्हता. यानंतर गावकऱ्यांनी 13 वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाची माहिती पोलिसांनी दिली. कोराडी नदीपात्रातील नाल्यातून 13 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर गावकऱ्यांनीच सिद्धेश्वर नन्हई यास पोलिसांच्या स्वाधीन केलंय. बापानंच हे धक्कादायक कृत्य केल्यानं संपूर्ण गाव हादरुन गेलं.

पत्नीच्या चारीत्र्यावर संशय

सिद्धेश्वर आणि त्यांच्या पत्नीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. सिद्धेश्वर यानं त्याच्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेतला होता. आपल्या पत्नीचे बाहेर कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याच्या राग सिद्धेश्वरच्या मनात होता. आपली मुलं ही दुसऱ्याकुणामुळे तरी झाली असल्याचं म्हणत सिद्धेश्वर आपल्याच पत्नीला दोष देत होता. पत्नीवरील चारीत्र्याच्या संशयातूनच त्यानं हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. सध्या पोलिसांनी सिद्धेश्वर याला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या –

Pune crime| हुंडा म्हणून बुलेट गाडीची मागणी करत विवाहितेचा केला छळ ; नऊजणा विरोधात गुन्हा दाखल

तब्बल 400 एटीएमचा डाटा चोरून लाखोंचा गंडा, पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या

kalyan Crime: सराईत गुन्हेगाराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केली अटक

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.