South Africa Firing : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील बारमध्ये गोळीबार; 14 ठार, तीन जखमी

ज्या बारमध्ये गोळीबार झाला तो परवानाधारक आहे. घटनेच्या वेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. अचानक हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. मात्र, आरोपींच्या गोळीबारामागील हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही.

South Africa Firing : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील बारमध्ये गोळीबार; 14 ठार, तीन जखमी
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 8:09 PM

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका बारमध्ये गोळीबार (Firing) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. जोहान्सबर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमध्ये असलेल्या बारमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा मिनीबस टॅक्सीमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. अचानक घडलेल्या या घटनेने लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करू लागले.

गोळीबाराचे कारण अनभिज्ञ

माहिती मिळताच जोहान्सबर्ग पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. गौतेंग प्रांताचे पोलीस आयुक्त लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरूनही गोळीबारात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचारी इलियास मावेला यांनी सांगितले की, ज्या बारमध्ये गोळीबार झाला तो परवानाधारक आहे. घटनेच्या वेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. अचानक हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. मात्र, आरोपींच्या गोळीबारामागील हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही.

अमेरिकेतही सतत घडतात गोळीबाराच्या घटना

अमेरिकेतही गोळीबाराच्या घटना सतत घडत असतात. अमेरिकेतील इंडियाना येथे 5 जुलै रोजी झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी 10 जणांना गोळ्या घातल्या. ब्रेनियानाच्या गॅरीमध्ये ब्लॉक पार्टीत ही घटना घडली. याच्या एक दिवस आधी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागोमध्ये गोळीबार झाला होता. फ्रीडम परेडमधून बाहेर पडत असताना अचानक गोळीबार झाला. परेडमध्ये गोळीबार झाल्यानंतर गोंधळ उडाला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 24 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने छतावरून गोळ्या झाडल्या होत्या. (14 killed three injured in firing at a bar in Johannesburg South Africa)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.