Jharkhand Death Sentence : कैद्याच्या हत्येप्रकरणी 15 जणांना फाशीची शिक्षा; झारखंडमधील कोर्टाचा निकाल

सरकारी पक्षाने सर्व 15 आरोपींचा हत्येच्या आरोपात सहभाग असल्याचे ठोस पुराव्यांनिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पुराव्यांना पुष्टी देणारे साक्षीदार देखील न्यायालयापुढे हजर केले.

Jharkhand Death Sentence : कैद्याच्या हत्येप्रकरणी 15 जणांना फाशीची शिक्षा; झारखंडमधील कोर्टाचा निकाल
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 1:32 AM

रांची : झारखंडमधील मध्यवर्ती तुरुंगात कैद्याची हत्या (Prisoner Murder) करणाऱ्या एकूण 15 आरोपींना फाशीची शिक्षा (Death Sentence) ठोठावण्यात आली आहे. झारखंडच्या पूर्व सिंगभूम जिल्हा न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला आहे. तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये जमशेदपूरच्या घाघीदिह मध्यवर्ती तुरुंगात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी (Fighting) झाली होती. त्या हाणामारीत एका कैद्याला प्राण गमवावा लागला. त्याप्रकरणी मागील दोन वर्षे जिल्हा न्यायालयात हत्येचा खटला चालला. सरकारी पक्षाने सर्व अटक आरोपींविरुध्द ठोस पुरावे सादर केले. त्याआधारे 15 आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने एकाच वेळी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सरकारी पक्षाने सादर केले कैद्यांच्या हाणामारीचे ठोस पुरावे

जमशेदपूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र कुमार सिन्हा यांनी हा निकाल सुनावला आहे. सरकारी पक्षाने सर्व 15 आरोपींचा हत्येच्या आरोपात सहभाग असल्याचे ठोस पुराव्यांनिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पुराव्यांना पुष्टी देणारे साक्षीदार देखील न्यायालयापुढे हजर केले. त्यावर पुरावे खोटे ठरवण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने आरोपींच्या वतीने केला. तथापि, सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र कुमार सिन्हा यांनी सर्व आरोपींना भादंवि कलम 302 (हत्या) आणि कलम 120-ब (गुन्हेगारी कारस्थान रचणे) अन्वये दोषी ठरवले आणि फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने आरोपींना मोठा दणका न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर इतर सात आरोपींना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कलम 307 अन्वये दोषी ठरवून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सरकारी वकिल राजेंद्र कुमार यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली.

दोन फरार दोषींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश

फाशीची शिक्षा झालेले दोघे दोषी सध्या फरार आहेत, असे झारखंडच्या पोलिसांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दोन फरार दोषींविरुद्ध आवश्यक कारवाई सुरू करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. 25 जून 2019 रोजी तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत मनोज कुमार सिंग याच्यासह दोन कैद्यांना गंभीर दुखापत झाली होती. यापैकी सिंहला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परसुडीह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (15 people sentenced to death by a court in Jharkhand in the case of murder of a prisoner)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.