शाळेत चार मुलांच्या घेऱ्यात सापडली १५ वर्षीय मुलगी; त्यानंतर जे घडलं ते भयानक
बलात्कार पीडितेचं समुपदेशन करण्यात आलं. घटनेनंतर मुलगी खूप घाबरलेली आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
युके : ही घटना आहे युकेतील. एक मुलगी शाळेत होती. पण, तिथं तिच्याच वयाचे चार मुलं आले. त्यांच्या तावडीत ती सापडली. त्यानंतर त्यांनी तिचे लचकेच तोडले. या घटनेनं ती प्रचंड हादरली. शाळा हे सुरक्षित ठिकाणी मानलं जातं. पण, हे ठिकाण १५ वर्षीय मुलीसाठी असुरक्षित होतं. शाळेत पालक आपल्या मुलांना सुरक्षित समजतात. परंतु, काही वेळा शाळा असुरक्षित होऊ शकते. युकेतील १५ वर्षीय मुलीला माहीत नव्हतं की, तिच्यावर बलात्कार होऊ शकेल. एक-दोन नाही, तर चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केला. या जखमा ती कधीही भरून जाणाऱ्या नाहीत.
चौघांनी अत्याचार केल्याचा आरोप
बलात्काराच्या आरोपाखाली चार मुलांना अटक करण्यात आली. चारही मुलं अफगानशी संबंधित आहेत. एकाने अत्याचार केला. तेव्हा इतर तिघे बाजूला सुरक्षा कवच म्हणून उभे होते. तेवढ्यात शाळेतील दुसरा एक मुलगा तिथं आला. अलार्म वाजवून सर्वांना गोळा केले. ६ फेब्रुवारीला या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली.
चारही आरोपी १४ ते १६ वयोगटातील
हे चारही आरोपी १४ ते १६ वयोगटातील आहेत. एका नावेने ते युकेत पोहचले. डोवर सेंट स्कूलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. केंट पोलिसांच्या प्रवक्याने सांगितलं की, आरोपींना जमानतीवर सोडण्यात आले आहे. परंतु, त्यांच्याकडून जबाब नोंदविला जात आहे. चारही मुलांनी अत्याचार केला नसल्याचं सांगितलं.
सीसीटीव्ही फुजेटची तपासणी
बलात्कार पीडितेचं समुपदेशन करण्यात आलं. घटनेनंतर मुलगी खूप घाबरलेली आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तपासणी केल्यानंतर नेमकं या घटनेतील गूढ काय आहे, हे उकलण्यास मदत होईल.
या १५ वर्षीय मुलीनं याचा विचारही केला नसेल. तिच्याच वयाच्या मुलांनी तिच्या एकाकिपणाचा गैरफायदा घेतला. त्यामुळं ती प्रचंड घाबरली आहे. समुपदेशानंतर ती काहीशी शांत झाली.