Mobile Game : गेम की व्यसन? मोबाईलवर गेम खेळण्यास आईने नकार दिला म्हणून 16 वर्षांच्या मुलाने उचलले भलतेच पाऊल, थेट लोकलखाली दिला जीव

आईने मोबाईलवर गेम खेळायला नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलाने थेट टोकाचं पाऊलं उचलत आपली जीनयात्रा संपवली आहे. रागाच्या भरातून त्याने थेट आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mobile Game : गेम की व्यसन? मोबाईलवर गेम खेळण्यास आईने नकार दिला म्हणून 16 वर्षांच्या मुलाने उचलले भलतेच पाऊल, थेट लोकलखाली दिला जीव
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:02 PM

मुंबई : आजकाल आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile Phone) आहे. हा फक्त मोबाईलच नाही तर मनोरंजनाचे (Entertaiment) एक साधनही आहे. मात्र हेच मनोरंजन व्यसनात बदलल्यास किती घातक ठरू शकतं याचं एक उदाहारण मुंबईत समोर आलं आहे. कारण आईने मोबाईलवर गेम (Mobile Game)खेळायला नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलाने थेट टोकाचं पाऊलं उचलत आपली जीनयात्रा संपवली आहे. रागाच्या भरातून त्याने थेट आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसात या मोबाईलमधील गेमने अनेकांच्या आयुष्याचा गेम काला आहे. अशी अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता हे गेम प्रकरण जास्तच धोकादायक झालंय. अनेक मुलं ही या मोबाईल गेमच्या आहारी जात आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

नेमका प्रकार काय घडला?

आईने मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिला म्हणून 16 वर्षाच्या मुलाने ट्रेनसमोर आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओम भगत हा सायंकाळी घरात बसून मोबाईलवर गेम खेळत होता, त्यावरून त्याच्या आईने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर ओम भगतने सुसाईड नोट लिहून घर सोडले. आई घरी आल्यावर तिला सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये ओमने आत्महत्या करणार असून परत येणार नाही असे लिहिले होते.

पोलिसांच्या शोधाशोधीनंतर प्रकरण उघड

सुसाइड नोट मिळताच कुटुंबीय थेट पोलिस ठाण्यात गेले, त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून त्यांचा शोध सुरू केला. तेव्हाच अंधेरी ते मालाड दरम्यान कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह ओम भगतचा होता. त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या घरच्यांनाही धक्का बसला आहे. त्यानंतर त्यांचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. हे फक्त ओमच्या घरच्यांसोबतच घडलं नाही तर अनेक पालक आणि मुलांसोबत हे घडलं आहे. त्यामुळे मुलांना या विळख्यातून बाहेर काढणं हे पालकांसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.