मुंबई : आजकाल आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile Phone) आहे. हा फक्त मोबाईलच नाही तर मनोरंजनाचे (Entertaiment) एक साधनही आहे. मात्र हेच मनोरंजन व्यसनात बदलल्यास किती घातक ठरू शकतं याचं एक उदाहारण मुंबईत समोर आलं आहे. कारण आईने मोबाईलवर गेम (Mobile Game)खेळायला नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलाने थेट टोकाचं पाऊलं उचलत आपली जीनयात्रा संपवली आहे. रागाच्या भरातून त्याने थेट आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसात या मोबाईलमधील गेमने अनेकांच्या आयुष्याचा गेम काला आहे. अशी अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता हे गेम प्रकरण जास्तच धोकादायक झालंय. अनेक मुलं ही या मोबाईल गेमच्या आहारी जात आहेत.
Mumbai | A 16-year-old boy allegedly died by suicide after his mother denied him from playing games on a mobile phone. He left a suicide note. His body was recovered from the railway track between Malad & Kandivali station: Dindoshi Police Station
— ANI (@ANI) June 9, 2022
आईने मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिला म्हणून 16 वर्षाच्या मुलाने ट्रेनसमोर आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओम भगत हा सायंकाळी घरात बसून मोबाईलवर गेम खेळत होता, त्यावरून त्याच्या आईने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर ओम भगतने सुसाईड नोट लिहून घर सोडले. आई घरी आल्यावर तिला सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये ओमने आत्महत्या करणार असून परत येणार नाही असे लिहिले होते.
सुसाइड नोट मिळताच कुटुंबीय थेट पोलिस ठाण्यात गेले, त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून त्यांचा शोध सुरू केला. तेव्हाच अंधेरी ते मालाड दरम्यान कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह ओम भगतचा होता. त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या घरच्यांनाही धक्का बसला आहे. त्यानंतर त्यांचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. हे फक्त ओमच्या घरच्यांसोबतच घडलं नाही तर अनेक पालक आणि मुलांसोबत हे घडलं आहे. त्यामुळे मुलांना या विळख्यातून बाहेर काढणं हे पालकांसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे.