चोरीछुपे आजही होतेय नायलॉन मांजाची विक्री, मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली आकडेवारी पाहून तुम्हाला धक्काच बसेल

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तीन संशयतांना अटक करण्यात आली आहे, गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने ही कारवाई केली आहे. मात्र दुसरीकडे नायलॉनच्या फासाची आलेली आकडेवारी धक्कादायक आहे.

चोरीछुपे आजही होतेय नायलॉन मांजाची विक्री, मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली आकडेवारी पाहून तुम्हाला धक्काच बसेल
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 11:13 AM

नाशिक : नायलॉन मांजा हा घातक असल्याचे सांगूनही सर्रास वापर होत असल्याचे समोर येत आहे. नायलॉन मांजाच्या फासातून समोर आलेल्या घटना चक्रावून टाकणाऱ्या आहे. नागरिकांच्या घटनांबरोबर पक्षांना लागलेल्या फासाच्या घटनांची आकडेवारी समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रातीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. त्यासाठी वापरला जाणारा मांजा हा नायलॉन मांजा आजही नागरिक वापरत असल्याचे समोर आले आहे. नाशिक मध्ये मागील महिन्यात एका वृद्धाच्या पायाला नायलॉन मांजा अडकल्याने त्याचे दोन्ही पाय अक्षरशः निकामी होण्याची वेळ आली होती. त्याच पार्श्वभूमीवर पक्षांना नायलॉन मांजाचा लागणारा फास बघूनही अनेकदा हळहळ व्यक्त केली जाते. पण मागील वर्षात जवळपास 168 पक्षांना नायलॉन मांजाचा फास लागला होता. त्यातील तीन पक्षांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक पक्षी गंभीर जखमी झाले होते. धोकादायक असलेला हा मांजा अनेकांच्या जिवावर बेतला असतांनाही नागरिक सर्रासपणे वापरत असल्याचं हे दुर्दैव म्हणावे लागेल.

नाशिक शहरात नुकतीच शहर पोलीसांनी नायलॉन मांजाच्या विक्रीवरुन अटक केली आहे. अशा कारवाया मकर संक्रातीच्या दरम्यान अनेकदा समोर येतात.

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तीन संशयतांना अटक करण्यात आली आहे, गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

तीन संशयतांकडून 62 मांजचे रीळ जप्त केले आहेत, कन्हैयालाल शर्मा, चेतन जाधव, अजय कुमावत अशा तीन आरोपींचे नावे आहेत.

मागील वर्षात सर्वाधिक जास्त कावळे नायलॉन मांजात अडकले आहेत, त्यांतर कबुरतरांचा क्रमांक लागतो.

अग्निशमन दलाचे जवान आणि पक्षी प्रेमींच्या माध्यमातून पक्षांना अनेकदा जीवदान दिल्याचे समोर आले आहे, नायलॉन मांजाच्या फासातून सुटका करण्यात आली आहे.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात नायलॉन मांजा वापरण्याच्या घटना अधिक असतात, त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांनाही काळजी घेण्याचे आवाहन या काळात केले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.