डोळ्यादेखत 17 लाख भामट्याने पळविले, बँकेच्या कर्मचाऱ्याला समजलं सुद्धा नाही
गेल्या बुधवारी एसबीआयच्या पेठरोड शाखेतून कॅशियर राजेंद्र बोडके यांनी त्यांच्या कॅश काउंटरवर जमा केलेली रक्कम टेबलावर ठेवली होती.
नाशिक : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिकच्या पेठरोडवरील शाखेतून दिवसाढवळ्या 17 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. या घटणेनेच्या कित्येक तासांनी ही बाब लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाल्याने हे पैसे कसे लंपास झाले आहे याची खात्री पटली आहे. बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधत एकाच्या टेबलावरुण 17 लाखांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस संशयिताचा शोध घेत आहे. या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे प्रबंधक युवराज दौलत चौधरी यांनी याबाबत पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या बुधवारी एसबीआयच्या पेठरोड शाखेतून कॅशियर राजेंद्र बोडके यांनी त्यांच्या कॅश काउंटरवर जमा केलेली रक्कम टेबलावर ठेवली होती.
दुपारच्या वेळी बँकेत ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने मात्र हे पैसे ठेवल्याचे पाहून तो बँकेतच इकडे तिकडे फिरत होता.
बँकेतील कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असल्याचे पाहून भामट्याने संधी साधली आणि काढून ठेवलेल्या रकमेपैकी 17 लाख काढून पिशवीत टाकत पसार झाला आहे.
दरम्यान ही संपूर्ण घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळाने कॅशियर राजेंद्र बोडके यांच्या लक्षात आली होती, त्यांनंतर त्यांनी ही संपूर्ण घटना शाखाधिकारी यांनी सांगितली होती.
या संपूर्ण घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना बँकेच्या अधिकाऱ्यानी कळवली होती, त्यानुसार बँकेत लागलीच पंचवटी पोलीसांनी धाव घेतली होती.
यावेळी तपासा कामी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पंचवटी पोलीसांनी ताब्यात घेतले असून संशयिताचा शोध घेत आहे.
बँक कर्मचाऱ्यांची नजर चुकवून भामट्याने रोकड लंपास केल्याची घटना देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
दरम्यान या घटणेनंतर पंचवटी परिसरातील बँकेत खळबळ उडाली असून या चोरीची जोरदार चर्चा सुरू आहे.