ओशोंचं प्रवचन ऐकून दोन जिगरी दोस्तांनी जीव सोडला; शेवटचे तीन स्टेटस काय?
ये दोस्ती हम नही छोडेंगे... जिगरी मित्रांचं आवडतं गाणं. आपल्यासाठी काहीही करण्याची धमक असलेले मित्र मुश्किलीने मिळतात. उत्तर प्रदेशच्या जालौनमध्येही असेच दोन जिगरी मित्र होते, एकत्र हसणारे, सुखातच नव्हे दु:खातही साथ न सोडणाऱ्या त्या दोघांनी अखेरचा श्वासही एकत्र घेतला. विषारी पदार्थ खाऊन दोघांनीही त्यांचं आयुष्य संपवलं.
ये दोस्ती हम नही छोडेंगे… जिगरी मित्रांचं आवडतं गाणं. आपल्यासाठी काहीही करण्याची धमक असलेले मित्र मुश्किलीने मिळतात. उत्तर प्रदेशच्या जालौनमध्येही असेच दोन जिगरी मित्र होते, एकत्र हसणारे, सुखातच नव्हे दु:खातही साथ न सोडणाऱ्या त्या दोघांनी अखेरचा श्वासही एकत्र घेतला. विषारी पदार्थ खाऊन दोघांनीही त्यांचं आयुष्य संपवलं. मात्र त्यापूर्वी दोन्ही मित्रांनी प्रसिद्ध तत्ववेत्ता ओशो यांचे प्रवचन ऐकले होते. त्यांच्यावर ओशोंचा खूप प्रभाव होता. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्यांनी चिता, अंत्ययात्रा असे स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. दोघांच्या मृत्यूची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासाअंती मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. दोन मित्रांच्या या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून अख्खं गाव हळहळत आहे.
हे संपूर्ण प्रकरण जालौनच्या काल्पी कोतवाली भागातील आहे, जिथे अमन वर्मा आणि बलेंद्र पाल नावाच्या दोन मित्रांनी काल एका निर्जन ठिकाणी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. या दुर्दैनी घटनेत बालेंद्रचा जागीच मृत्यू झाला, तर अमनची प्रकृती बिघडू लागली म्हणून त्याने कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठलं आणि दोघांनाही तातडीने उपचारासाठी काल्पी येथील आरोग्य केंद्रात नेले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अमनचा मृत्यू झाला. दोघांनीही एकत्रच अखेरचा श्वास घेतला.
या दुर्दैनी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अमन आणि बालेंद्र हे दोघे जिवश्चकंठश्च मित्र होते, हे तपासादरम्यान उघड झाले. अमनचे मेडिकल स्टोअर होते , त्याचे लग्नही झाले होते. बालेंद्र मात्र अविवाहीत होता आणि मित्राला भेटण्यासाठी नेहमी यायचाय.
शेवटचे स्टेटस काय?
ते दोन्ही, तत्वज्ञ ओशोंचे प्रवचन ऐकत असत आणि त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव होता. आयुष्य संपवण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी त्यांच्या मोबाईलवर तीन स्टेटस पोस्ट केले होते, ज्यावरून ते मृत्यूपूर्वी ओशोंचे प्रवचन ऐकत असल्याचे दिसून आले. विष प्राशन करण्यापूर्वी बालेंद्रने आपल्या फोनवर पोस्ट केलेल्या स्टेटसमध्ये चिता, अंत्ययात्रा आणि ओशोंचे फोटो होते. ‘मृत्यू हेच सत्य आहे’ असे त्या फोटोमध्ये लिहिले होते.
मात्र आपल्या तरण्याताठ्या मुलांच्या अशा अकस्मात जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवल आहेत. या दोन्ही मित्रांनी का आणि कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.