संस्थेत पाहुणा आला, त्यानेच घात केला… 2 अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्या तरूणास अटक
राज्यात कायदा -सुव्यवस्था खरंच आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे. हे कमी की काय म्हणून पु्ण्याजवळील आळंदीत एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या नराधम तरूणाने त्या संस्थेतील लहान मुलांना त्याच्या वासनेची शिकार बनवत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
महाराष्ट्रात लहान मुलं, महिला यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण अत्यंत वाढलं असून त्यामुळे राज्यात कायदा -सुव्यवस्था खरंच आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे. हे कमी की काय म्हणून पु्ण्याजवळील आळंदीत एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या नराधम तरूणाने त्या संस्थेतील लहान मुलांना त्याच्या वासनेची शिकार बनवत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून पोलिसांनी अखेर त्या नराधम तरूणास (वय 28) अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी महेश मिसाळ मामा व त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेली एक संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी तरूण हा पाहुणा म्हणून राहण्यास आला होता. मात्र घटना घडली त्या दिवशी, शनिवारी मध्यरात्री तो तरूण त्याच संस्थेत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांच्या खोलात आला आणि त्यांच्या शेजारीच झोपला. संस्थेतला पाहुणा आहे म्हणून कोणी त्याच्यावर आधी शंकाही घेतली नाही, ती मुलंही निर्धास्त झोपली होती, पण त्याने त्यांचाच घात केला.
त्या नराधम तरूणाने तेथेच शिकत असलेल्या 12 वर्षांच्या दोन तरूणांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचर केले. ही घटना उघडकीस येताच संस्थेत प्रचंड खळबळ माजली. मात्र संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याला वाचा फोडण्याचे ठरवले आणि आळंदी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत त्या नराधमाविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोप महेश याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.